टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाचे प्लेइंग ११ जाहीर, या खेळाडूंना स्थान, यांना डच्चू 

Team India's playing XI - 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसच्या फायनल सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.

Team India's playing XI for 2021 World Test Championship WTC final announced
टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाचे प्लेइंग ११ जाहीर 

थोडं पण कामाचं

  • 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसच्या फायनल सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
  • आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे,
  • जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे या संघाची घोषणा केली.

Team India's playing XI WTC । साऊथॅम्प्टन : 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसच्या फायनल सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यात भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज आणि तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद विजेतेपदासाठी साऊथॅम्प्टनमध्ये किवींविरूद्ध सामना खेळणार आहे. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे या संघाची घोषणा केली.

यापूर्वी अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला होता, परंतु शेवटच्या अकरामध्ये हनुमा विहारी, उमेश यादव, मोहम्मद. सिराज आणि रिद्धिमान साहा यांची निवड झाली नव्हती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय डावाची सलामी देतील तर मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रहाणे यांच्या हाती असेल. रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर आहेत तर जडेजा आणि अश्विन सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. भारतीय फलंदाजीमध्ये बरीच खोली आहे, तर इशांत शर्माची निवड या संघातील अनुभवाच्या आधारे केली गेली आहे.

मो. सिराजची चांगली कामगिरी लक्षात घेता कदाचित त्याला प्ले इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता होती पण इशांतचा अनुभव सिराजच्या तरूण भावनेवर भारी पडला. आणि त्याला संधी देण्यात आली. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात इशांतची चांगली कामगिरी राहिलेली आहे. 

वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपसाठी भारताचे ११ अंतीम खेळाडू -

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, ईशांत शर्मा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी