Boris Becker: महान टेनिसपटू बोरिस बेकरला होऊ शकते अटक, जाणून घ्या कारण 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 11, 2022 | 16:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Boris Becker । महान टेनिस खेळाडू बोरिस बेकरला दिवाळखोर घोषित केल्यानंतर बॅंक खात्यातून हजारो डॉलर्स बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे अटक होण्याची दाट शक्यता आहे.

 tennis player Boris Becker could be arrested for illegally transferring thousands of dollars
महान टेनिसपटू बोरिस बेकरला होऊ शकते अटक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महान टेनिसपटू बोरिस बेकरला होऊ शकते अटक.
  • दिवाळखोर घोषित केल्यानंतर बॅंक खात्यातून हजारो डॉलर्स बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे अटक होण्याची दाट शक्यता आहे.
  • ५४ वर्षीय बोरिस बेकरची २० अन्य प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्तता झाली आहे.

Boris Becker । नवी दिल्ली : महान टेनिस खेळाडू बोरिस बेकरला (Boris Becker) दिवाळखोर घोषित केल्यानंतर बॅंक खात्यातून हजारो डॉलर्स बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे अटक होण्याची दाट शक्यता आहे. लंडनच्या साउथवॉर्क क्राउन कोर्टातील ज्युरीने (खंडपीठ) बेकरला दिवाळखोरी कायद्याअंतर्गत चार आरोपांवर दोषी ठरवले, ज्यात मालमत्ता हस्तांतरित करणे, कर्ज लपवणे आणि मालमत्ता उघड करण्यात अयशस्वी होणे या दोन मुख्य आरोपांचा समावेश आहे. (tennis player Boris Becker could be arrested for illegally transferring thousands of dollars). 

अधिक वाचा : Jharkhand Ropeway Mishap : हवेत लटकला 48 जणांचा जीव

जर्मनीच्या या महान टेनिस खेळाडूला जून २०१७ मध्ये दिवाळखोर घोषित केल्यानंतर त्याने त्याच्या व्यावसायिक खात्यातून लाखो पाउंड (डॉलर्स) इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केले होते, ज्यामध्ये त्याची माजी पत्नी बार्बरा आणि शर्ली लिली बेकर यांचा देखील समावेश आहे. त्यांना जर्मनीतील संपत्ती घोषित करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल आणि टेक फर्ममधील ८२५,००० युरो (८९५,००० डॉलर्स) बॅंक कर्ज आणि शेअर्स लपवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. 

२० अन्य प्रकरणांतून निर्दोष मुक्तता

५४ वर्षीय बोरिस बेकरची २० अन्य प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्तता झाली आहे, ज्यामध्ये या देखील आरोपाचा समावेश होता की तो त्याचे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात अयशस्वी झाला आहे, ज्यामध्ये दोन विम्बल्डन ट्रॉफी आणि ऑलिम्पिक सुवर्णपदाचा समावेश आहे. सहावेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन असलेल्या बोरिसने सर्व आरोप फेटाळताना म्हटले की, त्याने आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी काम करणाऱ्या विश्वस्तांना सहकार्य केले आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार काम केले होते. 

६ वेळा पटकावले गॅंडस्लॅमचे जेतेपद 

टेनिसच्या दुनियेत बोरिसचे एक वेगळे नाव आहे, त्यांना टेनिसचा एक महान खेळाडू म्हणून ओळखले जाते. लक्षणीय बाब म्हणजे बोरिस ब्रेकरने ६ वेळा गॅंडस्लॅमचा किताब जिंकला आहे. रिसने १९८५ मध्ये विम्बल्डन ओपनमध्ये पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले. त्याने तीनदा विम्बल्डन, दोनदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि एकदा यूएस ओपन जिंकले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी