Serena Williams: २३ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या टेनिस स्टार सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घोषणा

Serena Williams announced retirement from Tennis: टेनिस स्टार सेरेना विल्यम्सनने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Tennis star serena Williams announces retirement
सेरेना विल्यम्सने केली निवृत्तीची घोषणा 
थोडं पण कामाचं
  • सेरेना विल्यम्सनने केली निवृत्तीची घोषणा
  • इंस्टाग्राम पोस्ट करत सेनेनाने केली घोषणा 

Serena Williams: जगभरात टेनिसच्या माध्यमातून आपली एक ओळख निर्माण केलेली अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्सनने निवृत्तीची घोषणा केली आहे. २३ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेल्या सेरेनाने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत निवृत्तीबाबतची माहिती दिली आहे. सेरेनाने म्हटलं, या वर्षातील अमेरिकन ओपन स्पर्धा ही तिची शेवटची टेनिस स्पर्धा असणार आहे. सेरेनाने १९९९ मध्ये सर्वात पहिली यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.

आपल्या पोस्टमध्ये सेरेनाने म्हटलं, आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. ती वेळ नेहमीच कठीण असते जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करता. मी टेनिसचा नेहमीच आनंद घेते. (Tennis star serena Williams announces retirement sports news in marathi)

६ वेळा यूएस ओपनचे जेतेपद 

महिला टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने यूएस ओपनमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिने आतापर्यंत एकूण ६ वेळा यूएस ओपनचे जेतेपद पटकावले आहे. १९९९, २००२, २००८, २०१२, २०१३ आणि २०१४ मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद सेरेनाने आपल्या नावावर केले. तर एकूण २३ वेळा ग्रँड स्लॅम विजेता देखील आहे. 

अधिक वाचा : भारताचा हा दिग्गज क्रिकेटर बनला नेपाळी संघाचा कोच, बीसीसीआयने मॅच फिक्सिंगप्रकरणी घातली होती बंदी

सेरेनाची यशस्वी कामगिरी 

ग्रँड स्लॅम  कधी जिंकली
ऑस्ट्रेलियन ओपन २००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५, २०१७ 
फ्रेंच ओपन २००२, २०१३, २०१५ 
विम्बलडन २००२, २००३, २००९, २०१०, २०१२, २०१५, २०१६
यूएस ओपन १९९९, २००२, २००८, २०१२, २०१३, २०१४

२३ वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारी सेरेना आगामी काळात आपल्याला आणखी एक बाळ होण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. सेरेनाने म्हटलं होतं, गेल्या वर्षभरापासून अलेक्सिस आणि मी एका मुलासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला नुकतीच आमच्या डॉक्टरांकडून काही माहिती मिळाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी