मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर(south africa tour) रवाना होण्याआधी टीम इंडियाला(team india) मोठा झटका बसला आहे. मुंबईत(mumbai) भारतीय संघ सध्या मुंबईत सराव(practice) करत आहे. आणि या दरम्यान संघाचा उप कर्णधार रोहित शर्माला(rohit sharma injured) दुखापत झाली आहे. सराव सत्रादरम्यान रोहित शर्माच्या हातावर दुखापत झाली आहे. एका इंग्रजी बातमीनुसार रविवारी मुंबईत जेव्हा टीम इंडियाचे खेळाडू सराव करत होते तेव्हा रोहित शर्माही फलंदाजी करत होता. तेव्हा टीम इंडियाचा थ्रो डाऊन एक्सपर्ट रघुच्या एका बॉलवर रोहित शर्माला दुखापत झाली. थ्रो डाऊनने निघालेला बॉल सरळ रोहित शर्माच्या ग्लव्ह्जवर लागला. यानंतर त्याला खूप त्रास होऊ लागला. रोहित शर्माने यानंतर काही वेळ फलंदाजी केली मात्र नंत तो करू शकला नाही. Ind Vs SA: आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा झटका
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. यावेळी अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माच्या हाती उपकर्णधारपदाची कमान देण्यात आली आहे. टीम इंडिया १६ डिसेंबरला द. आफ्रिकेसाठी रवाना होत आहे. याआधी टीन तीन ते चार दिवस क्वारंटाईन असेल. येथून रवाना झाल्यानंतरही टीम इंडिया द. आफ्रिकेत काही दिवस क्वारंटाईन असणार आहे. द. आफ्रिकेत भारताचा पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होत आहे.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान..साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.
२६-३० डिसेंबर पहिली कसोटी, सेंच्युरियन
३ ते ७ जानेवारी दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग
११-१५ जानेवारी तिसरी कसोटी, केपटाऊन
१९ जानेवारी पहिली वनडे, पार्ल
२१ जानेवारी दुसरी वने, पार्ल
२३ जानेवारी तिसरी वनडे, केपटाऊन