गुहेमध्ये हरवलेली फुटबॉल टीम तब्बल ९ दिवसांनी सापडली सुखरूप

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 06, 2018 | 08:03 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बंद गुहेत कसे राहिले फुटबॉलपटू?

गुहेत मदतकार्य करताना बचावपथक
Photo: AP  |  फोटो सौजन्य: AP

नवी दिल्ली : थायलंडमधील माई साई जिल्ह्यात असलेल्या एका गुहेत फुटबॉल टीम बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर आलं आणि एकच खळबळ उडाली. या टीममध्ये एकूण १२ अल्पवयीन मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक होता. या टीमला शोधण्यासाठी संपूर्ण प्रशासन आणि बचावपथक तात्काळ कामाला लागलं. मात्र, अनेक दिवस झाले तरी टीमला शोधण्यात यश मिळत नव्हतं. अखेर सोमवारी म्हणजेच तब्बल ९ दिवसांनी या टीमला शोधण्यात बचावपथकाला यश मिळालं आहे. पण, हे फुटबॉलपटू ९ दिवस कसे राहिले? त्यांनी काय खाल्लं? या सारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहूयात सविस्तर वृत्त…

गुहेमधील व्हिडिओ समोर

युवा फुटबॉल टीम आणि त्यांचा २५ वर्षीय सहाय्यक प्रशिक्षक हे २३ जून रोजी प्रॅक्टिस करुन गुहा पाहण्यासाठी गेले मात्र, त्याच दरम्यान अचानक जोरदार पाऊस सुरु झाला आणि गुहेमधून बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाला. परिणामी संपूर्ण फुटबॉल टीम गुहेतच अडकली. गुफेत अडकलेली संपूर्ण टीम जिवंत असल्याचं वृत्त नंतर समोर आलं तसेच गुहेमधील त्यांचा एक व्हिडिओही समोर आला. गुहेत टीम सुरक्षित असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर सर्वांनाच एक दिलासा मिळाला.

पावसामुळे बचावात अडथळा

गुहेत बेपत्ता झाल्यापासून या मुलांसोबत कुठलाच संपर्क झाला नव्हता. ११-१६ या वयोगटातील ही सर्व मुलं आहेत. उत्तर थायलंडमधील थाम लोंग गुहेत ही मुलं अडकली होती. त्यातच सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावपथकाला अनेक अडथळे येत होते.  

गुहेत शिरलं पाणी आणि मग...

मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे हळूहळू गुहेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. गुहेत पाणी शिरल्यामुळे बचावपथकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, नंतर पाऊस थांबला आणि मग बचाव मोहिम वेगाने सुरु करण्यात आली. गुहेत अडकलेल्या संपूर्ण टीमला बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही मदत घेण्यात आली आहे.

'मी तुम्हाला आश्वासन देतो की, आम्ही संपूर्ण टीमचा शोध घेतला आहे. वैद्यकिय अधिकारी सध्या त्यांची तपासणी करत आहेत. त्यांना आवश्यक औषधोपचार करुन त्यांना लवकरात लवकर गुहेतून बाहेर काढण्यात येईल' अशी माहिती राज्यपाल नारोंगसाक ओसोट्टानाकोर्न यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी