Navi Mumbai Premier League । ठाण्याचा नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये सर्वात मोठा विजय; बेलापूरला विक्रमी फरकाने दिला धोबीपछाड

Navi Mumbai Premier League 2023 : ठाण्याने बेलापूरचा ९१ धावांनी पराभव केला, जो नवी मुंबई प्रिमियर क्रिकेटमधील धावांच्या दृष्टीने सर्वात मोठा विजय आहे.

Thane Tigers beat Belapur Blasters by a huge margin
Navi Mumbai Premier League । ठाण्याचा नवी मुंबई प्रीमियर लीगचा सर्वात मोठा विजय; बेलापूरला विक्रमी फरकाने दिला धोबीपछाड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ठाणे टायगर्सचा बेलापूर ब्लास्टर्सवर मोठ्या फरकाने विजय
  • ९१ धावांनी मिळवला दणदणीत विजय
  • बेलापूर संघ ४८ धावांत गुंडाळला

Thane Tigers vs belapur blasters : दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या नवी मुंबई प्रिमियर लिगमध्ये आज ठाणे टायगर्सने दणदणीत विजयाची नोंद केली. त्यांनी बेलापूर ब्लास्टर्सचा ९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. ठाण्याने प्रथम फलंदाजी करताना १३९ धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांनी बेलापूरचा संघ ४८ धावांत गुंडाळला. फलंदाज आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट खेळामुळे हा विजय मिळवणे सोपे झाले. (Thane Tigers beat Belapur Blasters by a huge margin)

अधिक वाचा : Navi Mumbai Premier League : शुभमच्या फलंदाजीने अंबरनाथ अ‍ॅव्हेंजर्सची उडवली दणादाण; 5 गडी राखत सानपाडा संघाचा विजय

ठाणे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघातील खेळाडू  मोठी धावसंख्या उभारण्याचे इरादे स्पष्ट झाले. बिन्स नियोथने झटपट धावा करण्यास सुरुवात केली. त्याने ३६ बाॅलमध्ये  ५९ धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर ठाण्याने २० षटकात ७ विकेट गमावून १३९ धावा केल्या. बेलापूरकडून साहिल फेगडे आणि अनिकेत खडपे यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. 

१३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बेलापूरच्या एका पाठोपाठ एक विकेट गेल्या. एकाही खेळाडूला मोठी केली करता आली नाही. फक्त चिन्मय सुतारने १५ धावांची खेळी केली. त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली. विकेट जात राहिल्याने ठाणे संघाने दिलेले लक्ष बेलापूर संघाला गाठता आले नाही.  ठाणे संघातील भविन दार्जीने चार षटकामध्ये ८ धावा देत चार विकेट घेतल्या. ठाण्याने बेलापूरचा डाव १३.२ षटकांत ४८ धावांत गुंडाळला. उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल भविन दार्जीचा सामानवीर म्हणून पारितोषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी एमसीए टुर्नामेंट कमिटीचे सदस्य अभिजित घोष, प्रदीप कासलिवाल, शहा आलम शेख, जितेंद्र गोहिल, दत्ता मित्तभावकर, बालू कामटेकर आदी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी