England vs New Zealand: लॉर्ड्स कसोटीकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; तिकीटे न विकल्याने स्टुअर्ट ब्रॉड नाराज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 01, 2022 | 16:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Stuart Broad on Cricket Match Ticket Price । इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी सामन्याचा थरार रंगायला आता काही तासच बाकी आहेत.

The audience turned their backs on the Lord's Test; Stuart Broad annoyed at not selling tickets
लॉर्ड्स कसोटीकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, हे आहे प्रमुख कारण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका.
  • पहिला कसोटी सामना २ जूनपासून सुरू होणार आहे.
  • हा सामना लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाईल.

Stuart Broad on Cricket Match Ticket Price । नवी दिल्ली : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी सामन्याचा थरार रंगायला आता काही तासच बाकी आहेत. एका नव्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे मात्र पहिले चार दिवस तिकिटांसाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह नसल्यामुळे, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला की मैदानावर समर्थकांना परत आणण्यासाठी संघाला शानदार क्रिकेट खेळावे लागेल. कारण पहिल्या कसोटी सामन्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असून प्रेक्षक सामन्याकडे दुर्लक्ष करत आहेत. (The audience turned their backs on the Lord's Test; Stuart Broad annoyed at not selling tickets). 

अधिक वाचा : वंचितने आक्रमक भूमिका घेताचं चंद्रकांत खैरे मागे हटले

लॉर्ड्स कसोटीकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना २ जूनपासून सुरू होणार असून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणाऱ्या या सामन्याची बरीच तिकिटे शिल्लक आहेत. इंग्लंडच्या क्रिकेट सत्राचा महत्त्वाचा भाग मानला जाणाऱ्या या सामन्यासाठी अजून प्रेक्षकांच्या १६,००० हून अधिक जागा रिकाम्या आहेत. तिकीट न विकण्यामागे अनेक कारणे आहेत. तिकीटे खूप महाग आहेत दरम्यान एका दिवसाचे तिकीट सुमारे २०० डॉलर एवढे आहे. याशिवाय राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या प्लॅटिनम ज्युबिलीनिमित्त इंग्लंडमध्ये आणखी अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांचा कल या कार्यक्रमाकडे देखील असल्याचे बोलले जात आहे. 

इंग्लंडचा कसोटी संघ देखील त्यांच्या जुन्या लयनुसार खेळताना दिसत नाही. कारण संघाला मागील १७ सामन्यांतील एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. त्यानंतर बेन स्टोक्सची कर्णधारपदी आणि ब्रेंडन मॅक्क्युलमची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

तिकीटे न विकल्याने स्टुअर्ट ब्रॉड नाराज

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने म्हटले की, "प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला शानदार क्रिकेट खेळावे लागेल. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या तीन दिवसांची तिकिटे विकली गेली आहेत आणि जर आम्ही येथे चांगला खेळ केला तर आणखी मोठ्या संख्येने लोकं नक्कीच मैदानावर येतील. साहजिकच तिकीटे न विकल्याने ब्रॉड नाराज झाला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला आपले कसोटी क्रिकेटमधील अस्तित्व शाबूत ठेवायचे असेल तर उद्याच्या सामन्यात उल्लेखणीय कामगिरी करणे गरजेचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी