Greg Barclay । नवी दिल्ली : आयसीसीचे (ICC) अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी भीती व्यक्त केली आहे की, देशांतर्गत टी-२० लीगच्या वाढत्या संख्येमुळे द्विपक्षीय मालिका कमी होत आहेत आणि पुढील दशकात तर कसोटी सामन्यांची संख्या देखील कमी होऊ शकते. कसोटी क्रिकेटचा एक सामना पाच दिवसांचा असतो त्यामुळे प्रेक्षकांचा त्याकडे कल नसतो. नोव्हेंबर २०२० मध्ये आयसीसीचे अध्यक्ष बनलेल्या बार्कले यांनी म्हटले की, पुढील वर्षापासून सुरू होणाऱ्या पुढील भविष्यातील दौऱ्याचे वेळापत्रक ठरवताना आयसीसीला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. (The future of cricket's Test format is in jeopardy, ICC President expresses fears).
अधिक वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला १६ अटींसह परवानगी
बीबीसीच्या 'टेस्ट मॅच स्पेशल' या कार्यक्रमात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी म्हटले की, "दरवर्षी महिला आणि पुरुष क्रिकेटसाठी एक स्पर्धा असते." याशिवाय देशांतर्गत लीग वाढत आहेत. त्यामुळे द्विपक्षीय मालिकांमध्ये घट होत चालली आहे. कसोटी क्रिकेट हा येत्या १० ते १५ वर्षांत खेळाचा अविभाज्य भाग राहील, पण सामन्यांची संख्या कमी होऊ शकते. असे बार्कले यांनी अधिक म्हटले.
महिला क्रिकेटमध्ये कसोटीचे स्वरूप तितक्या वेगाने विकसित होत नाही, असेही ग्रेग बार्कले म्हणाले. ते आणखी म्हणाले की, "कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी देशांतर्गत रचना अशी असावी जी आताच्या घडीला कोणत्याच देशात नाही. तसेच महिला क्रिकेटमध्ये कसोटीचे स्वरूप तितक्या वेगाने विकसित होत नाही, असे मला वाटत नाही. असे त्यांनी अधिक म्हटले.
त्यांनी म्हटले की, कसोटी क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आले तर याचे दुर्दैवी परिणाम होतील. खासकरून खेळण्याच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून आणि ज्या देशांना जास्त खेळण्याची संधी मिळत नाही अशा देशांच्या कमाईच्या दृष्टिकोनातून, विशेषतः भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध याचे परिणाम जाणवतील. त्यांनी हे देखील म्हटले की, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांवर त्याचा परिणाम होणार नाही.