T-20 World Cup : दोन पराभवानंतर टीम इंडियासाठी अजूनही आशेचा किरण शिल्लक, सेमीफायनलमधील भवितव्य या संघाच्या हाती

ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव झाला आहे. टीम इंडियाने आपले दोन सामने गमावले आहेत, त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या त्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत, पण एक असा संघ आहे ज्याचा विजय टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या दिशेने घेऊन जाईल.

The future of Team India in T20 World Cup 2021 is in the hands of this team, will India play in the semifinals based on their performance? It will be!
T-20 World Cup : दोन पराभवानंतर टीम इंडियासाठी अजूनही आशेचा किरण शिल्लक, सेमीफायनलमधील भवितव्य या संघाच्या हाती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव
  • टीम इंडियाने आपले दोन सामने गमावले
  • एक असा संघ आहे ज्याचा विजय टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या दिशेने घेऊन जाईल

नवी दिल्ली : भारतीय संघाला दुबईच्या खेळपट्ट्या फारशा पचनी पडत नाही. T20 विश्वचषक 2021 च्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताचा एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही, तसेच गोलंदाजही कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानने 10 गडी राखून पराभूत केले होते. या दोन पराभवांमुळे टीम इंडियाची टी20 विश्वचषक 2021 मोहीम संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, परंतु अजूनही आशेचा किरण शिल्लक आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचेल अशी आशा तमाम भारतीयांना आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत कशी एन्ट्री घेणार हे जाणून घेऊया.(The future of Team India in T20 World Cup 2021 is in the hands of this team, will India play in the semifinals based on their performance? It will be!)

तिन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजयी खेळी करावी लागणार

T20 विश्वचषकात जो गट सर्वात सोपा मानला जात होता. हाच गट 2 भारतासाठी अडचणीचा ठऱला आहे. टीम इंडियाने आपले दोन्ही सामने गमावले आहेत, पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आणि दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्धचा. भारताचे तीन सामने बाकी आहेत. उपांत्य फेरी गाठायची असेल तर अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल जेणेकरून त्यांचा निव्वळ धावगती वाढू शकेल. अफगाणिस्तानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले पाहिजे अशी प्रार्थनाही भारतीयांना करावी लागेल. त्यामुळे भारत गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचेल आणि त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडतील.


पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचणार 

पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकून गटात अव्वल स्थान कायम राखल्याने उपांत्य फेरी गाठणे निश्चित झाले आहे. या गटात दुसऱ्या संघासाठी अजूनही लढत सुरू आहे. पाकिस्तान संघाने भारताला हरवून इतिहास बदलला. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानलाही पाकिस्तानी संघाने शानदार पद्धतीने पराभूत केले.

3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध सामना

दोन्ही पराभव विसरून टीम इंडिया पूर्ण तयारीनिशी अफगाणिस्तानविरुद्ध उतरणार आहे. भारताला हा सामना हलक्यात घ्यायचा नाही, कारण अफगाणिस्तानकडे रशीद खान आणि मुजीब उर रहमानसारखे फिरकीपटू आहेत, जे कधीही सामन्याचे वळण लावू शकतात. टीम इंडियाला या दोघांपासून सावध राहण्याची गरज आहे.


न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सिलसिला कायम आहे

दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नशिबाने पुन्हा साथ दिली नाही आणि तो नाणेफेक हरला. न्यूझीलंडने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि संपूर्ण टीम इंडिया 20 षटकात केवळ 110 धावाच करू शकली. भारताकडे अनेक मोठे खेळाडू होते, पण या सामन्यात कोणीही कमाल दाखवू शकले नाही. किवी संघाने 14.3 षटकात 111 धावा करत सामना जिंकला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी