T20 World Cup: क्रिकेट जगाचे वातावरण गरम करणाऱ्या भारतीय खेळाडूंना जेवणात दिलं थंड सॅण्डविच; टीम इंडियाने नाकरलं Lunch

सिडनीमध्ये दाखल होताच भारतीय खेळाडू (Indian player)सराव (Practice) करण्यात गुंतले. परंतु या दरम्यान देण्यात आलेल्या नाष्ट्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भारतीय खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीमुळे क्रिकेटच्या जगातील वातावर गरम केलं आहे. त्याच खेळाडूंना जेवणात थंड झालेले सॅण्डविच देण्यात आले. यावर खेळाडू नाराज झाले असून त्यांनी याप्रकरणी आयसीसीकडे तक्रार केली आहे.

The Indian players given a cold sandwich, Team India refused Lunch
थंड झालेल्या सॅण्डविचमुळे सरावानंतर सिडनीत तापलं वातावरण   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सिडनीमध्ये भारतीय संघ नेदरलँड्सच्या संघाशी भिडणार आहे.
  • रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, दीपक हुडा, युझवेंद्र चहल आणि दिनेश कार्तिक यांनी भरपूर सराव केला.
  • भारतीय संघाला जेवणात फळं आणि गार झालेले सॅण्डविच मिळाले.

नवी दिल्ली :  टी20 2022 विश्वकपमधील (T20 2022 World Cup) पहिला सामना (match) दमदार पद्धतीने जिंकून टीम इंडियाने (Team India) अख्या प्रतिस्पर्धींच्या कपाळावरील घाम पुसायला लावला. आपल्या पुढील सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सिडनीमध्ये (Sydney) दाखल झाला आहे. सिडनीमध्ये भारतीय संघ नेदरलँड्सच्या (Netherlands) संघाशी भिडणार आहे. सिडनीमध्ये दाखल होताच भारतीय खेळाडू (Indian player)सराव (Practice) करण्यात गुंतले. परंतु या दरम्यान देण्यात आलेल्या नाष्ट्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भारतीय खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीमुळे क्रिकेटच्या जगातील वातावर गरम केलं आहे. त्याच खेळाडूंना जेवणात थंड झालेले सॅण्डविच देण्यात आले. यावर खेळाडू नाराज झाले असून त्यांनी याप्रकरणी आयसीसीकडे तक्रार केली आहे.  (The Indian players given a cold sandwich, Team India refused Lunch)

अधिक वाचा  : पुलकित सम्राटच्या प्रेयसीचं फोटोशूट पाहून सगळेचं चक्रावले

पुढील सामन्यातही पहिल्या सामन्यासारखी दमदार कामगिरी व्हावी यासाठी भारती संघ सज्ज झाला आहे. सिडनीमध्ये दाखल होताच रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघ लगेच सरावाला लागला. विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, दीपक हुडा, युझवेंद्र चहल आणि दिनेश कार्तिक यांनी भरपूर सराव केला. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल यांनी विश्रांती घेतली. 

अधिक वाचा  :  शिक्षक बनला नराधम, सहावीमधील 11 मुलींचा विनयभंग

दरम्यान सिडनीमधील हवामान खूप थंड आहे. तेथे गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाला आहे. दरम्यान संघाचा सराव झाल्यानंतर भारतीय संघाला जेवण देण्यात आलं. सरावानंतर संघाला भारतीय संघाला एक परिपूर्ण जेवण हवं  होतं. परंतु या जेवणात फळे आणि सॅण्डविच होत, त्यातही सॅण्डविच गार झालेले होते. 

अधिक वाचा  :  महाकाय अजगरानं 54 वर्षाच्या महिलेला दोन तासात गिळलं

सिडनी में मौसम काफी ठंडा है। पिछले कुछ दिनों से लगातार बारिश हुई है। प्रैक्टिस के बाद जब लंच परोसा गया तो उसमें ठंडी सैंडविच और फल थे, जबकि टीम इंडिया को प्रॉपर लंच की जरूरत थी। वृत्तानुसार, निराश झालेल्या टीम इंडियाने याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रारही केली आहे. दुसरीकडे, त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ब्लॅकटाऊनमध्ये सराव करायचा होता. हे स्टेडियम टीम इंडियाच्या हॉटेलपासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. 

याआधी भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 4 विकेटने पराभव केला होता. या सामन्यात विराट कोहलीने झंझावाती अर्धशतक ठोकत बाबर सैन्याच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला होता.  हार्दिक पांड्याने बॉल आणि बॅट दोन्हीत कहर केला. या संघाचा पुढील सामना सिडनी क्रिकेट मैदानावर नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी