WWE सुपरस्टार 'द रॉक'च्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 06, 2019 | 15:17 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

The Rock: डब्ल्यूडब्ल्यूईमधील सुपरस्टार आणि अभिनेता ड्वेन 'द रॉक' जॉनसन याने WWEमधून निवृत्ती घेण्याचं जाहीर केलं आहे. निवृत्ती जाहीर करताना द रॉक याने भविष्यात पुन्हा रेसलिंगमध्ये येण्याच्या प्रश्नावर म्हटलं..

The Rock Dwayne Johnson
'द रॉक' ड्वेन जॉनसन 

थोडं पण कामाचं

  • 'द रॉक'च्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी
  • ड्वेन 'द रॉक' जॉनसनने डब्ल्यूडब्ल्यूईमधून निवृत्ती घेण्याची अधिकृत घोषणा केली
  • द रॉक याने रेसलिंगमधील शेवटची मॅच रेसलमेनिया 29 मध्ये जॉन सीना विरुद्ध खेळली होती

न्यूयॉर्क: 'द रॉक' या नावाने तरुणांमध्ये पोहोचलेल्या ड्वेन जॉनसन याने डब्ल्यूडब्ल्यूई म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. रेसलिंगनंतर हॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेल्या 'द रॉक' याचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. रॉक ने घेतलेल्या निवृत्तीच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी असणार आहे. मात्र, भविष्यात रेसलिंगमध्ये पुनरागमन करण्याच्या शक्येतेलाही 'द रॉक'ने नाकारलं नाहीये.

द रॉक ने पहिल्यांदाच अशाप्रकारे सार्वजनिक पद्धतीने निवृत्तीविषयी भाष्य केलं नाहीये. एका चॅट शो दरम्यान ड्वेन जॉनसन याने म्हटलं की, "मला रेसलिंगची खूपच कमी जाणवते, रेसलिंग मला खूपच आवडते. मी शांतपणे रेसलिंगमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला कारण मी खूप भाग्यशाली आहे की एक चांगलं करिअर मला मिळालं आणि ते मी पूर्ण करत आहे. पण लाईव्ह ऑडियन्स, प्रेक्षकांची लाईव्ह रिअॅक्शन याच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही अनुभव खास नाही".

द रॉक याने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपली शेवटची मॅच जॉन सीना याच्या विरुद्ध खेळली होती. रेसलमेनिया 29 मध्ये द रॉकने ही मॅच खेळली होती. यावेळी डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशिप स्पर्धेत रॉकला पराभवाच सामना करावा लागला होता. तसं पहायला गेलं तर 'द रॉक'ची अधिकृत शेवटची मॅच रेसलमेनिया 32 मध्ये होती जेथे त्याने याट परिवाराच्या विरुद्ध मॅच खेळली होती. यापूर्वी द रॉक ने ब्रे याट आणि ब्रॉन स्ट्रोमॅन यांच्यासोबत मॅच खेळली होती.

एक महत्वाकांक्षी फुटबॉल खेळाडू असलेल्या जॉनसन याने 1996 मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईचा करार केला. तेव्हा वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूएफ या नावाने प्रसिद्ध होतं. द रॉक याने पहिल्यांदा डब्ल्यूडब्ल्यूएफ चॅम्पियनशिप 1998 मध्ये जिंकली आणि डब्ल्यूडब्ल्यूएफमध्ये आपलं एक वेगळचं वर्चस्व निर्माण केलं. तो काळ इंडस्ट्रीमधील एक शानदार काळ होता.

आठवेळा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन राहिलेल्या द रॉक याने 2004 मध्ये इंडस्ट्री सोडली त्याचं कारण म्हणजे त्याला अभिनय क्षेत्रात करायचं करिअर. द रॉक याचं अभिनय क्षेत्रातील करिअर सुद्धा खूपच खास आहे. त्याने एकामागे एक असे सुपरहिट सिनेमा दिले. त्यानंतर 2011 मध्ये पार्ट-टाइम रेसलर बनून द रॉक रिंगमध्ये परतला. 1997 मध्ये प्रसिद्ध मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये सर्वाइवर सीरिजमध्ये आपली डेब्यू मॅच खेळण्यासंदर्भात 'द रॉक' ने म्हटलं, 'डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये माझी सर्वात पहिली मॅच मेडिसन स्केअर गार्डन येथे झाली होती. तेथील दृश्य हे खूपच खास होते कारण मी प्रो रेसलिंगमध्ये आपल्या यात्रेला श्रेय दिलं ज्याच्यामुळे मी आज येथे पोहोचलो'.

द रॉक ने पुढे म्हटलं की, 'सामान्यत: तुमची पहिली मॅच लहान शहरात होते आणि प्रेक्षकही कमी असतात. तसेच याचं टीव्हीवर प्रसारण सुद्धा होत नाही. माझ्या मॅचच्या सर्वच तिकिटांची विक्री झाली होती. हा वर्षातील सर्वात मोठा पे-पर-व्यू इव्हेंटपैकी एक होता. कुणालाच माहिती नव्हतं की मी कोण आहे. असं म्हणतात की न्यूयॉर्कच्या जनतेचं मन तुम्ही जिंकलं तर सर्वांचीचं मनं जिंकाल. न्यूयॉर्कमधील प्रेक्षक आपली खूप मोठी परीक्षा घेतात. माझी मॅच सुरू होऊन १५ मिनिटे होताच २२,००० प्रेक्षकांनी रॉकी, रॉकीच्या घोषणा देण्यास सुरूवात केली आणि ते मी कधीच विसरु शकत नाही'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी