Bodybuilding competition: मुंबईतील भांडुपमध्ये आज रंगणार राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार; महेंद्र चव्हाण जेतेपदाचा प्रमुख दावेदार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 07, 2022 | 10:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bodybuilding competition In Mumbai । तब्बल दोन वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर आज शनिवारी ७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा मुंबईतील भांडुप येथे पार पडेल.

The thrill of the state level bodybuilding competition will be played in Bhandup, Mumbai today 
भांडुपमध्ये आज रंगणार राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज शनिवारी ७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
  • ही स्पर्धा मुंबईतील भांडुप येथे पार पडेल.
  • भांडुप पश्चिमेला लाला शेठ कंपाऊंड येथील अशोक केदारे चौकाजवळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Bodybuilding competition In Mumbai । भांडूप : तब्बल दोन वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर आज शनिवारी ७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत शरीरसौष्ठव स्पर्धेचा (Bodybuilding competition) थरार रंगणार आहे. ही स्पर्धा मुंबईतील भांडुप येथे पार पडेल. दरम्यान मोठ्या कालावधीनंतर होत असलेल्या या स्पर्धेत जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आयोजक दिना बामा पाटील प्रतिष्ठानच्या राजोल संजय पाटील यांच्या कल्पक आयोजनाखाली ही स्पर्धा पार पडत आहे. मुंबई क्लासिक २०२२ स्पर्धेत महाराष्ट्रातील एकापेक्षा एक अशा १५० हून अधिक खेळाडूंमध्ये ४ लाखांच्या रोख पुरस्कारांसाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. (The thrill of the state level bodybuilding competition will be played in Bhandup, Mumbai today). 

अधिक वाचा : घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ

मुंबई क्लासिक स्पर्धा ठरवणार नवीन दिशा

दरम्यान, आगामी जुलै महिन्यात मालदीव येथे होत असलेल्या आशियाई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी येत्या २२ मे रोजी हिमाचल प्रदेशात भारतीय संघाची निवडी चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीसाठी महाराष्ट्रातील दिग्गजांची निवड याच स्पर्धेत केली जाणार असल्यामुळे मुंबई क्लासिक स्पर्धेकडे राज्यासह देशाचे लक्ष असणार आहे. 

प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूला बक्षीस

भांडूप पश्चिमेला लाला शेठ कंपाऊंड येथील अशोक केदारे चौकाजवळ होत असलेल्या या स्पर्धेला भव्य आणि दिव्य  करण्यासाठी  दिना बामा पाटील प्रतिष्ठानने जोरदार तयारी केली आहे. २ मागील ३ वर्षांपासून जगभरात तांडव घातलेले कोरोनाचे संकट टळल्यानंतर पुन्हा एकदा या खेळाकडे खेळाडू वळावेत म्हणून आम्ही प्रत्येक गटात विजेत्यांना जास्तीत जास्त रोख रक्कम दिली जाणार आहे.  एवढेच नव्हे तर किताब विजेत्याला पाऊण लाखाचे रोख बक्षिस ठेवण्यात आले असून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूच्या मेहनतीलाही प्रोत्साहन मिळावे म्हणून ५० हजार आणि २५ हजारांचे रोख पुरस्कार दिले जाणार असल्याचे आयोजिका राजोल पाटील यांनी सांगितले. 

ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० आणि ८० किलोवरील अशा एकंदर सात गटात खेळली जाणार असून प्रत्येक गटात पहिल्या तीन खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासह पहिल्या पाच खेळाडूंना १०, ८, ६, ४ आणि ३ हजार अशी रोख रकमेची बक्षीसेही दिली जातील.

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव फिटनेस संघटनेने या स्पर्धेची भव्यता वाढविण्यासाठी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा घेतली असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील दिग्गज उतरणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अमोल किर्तीकर यांनी दिली. या स्पर्धेत श्री महेंद्र चव्हाण, तौफिक मोमीन, रोहन गुरव, सुशांत रांजणकर, गणेश पेडामकर, भास्कर कांबळीसह सुजन पिळणकर, सागर नागावकर, नरेश नागदेव, हर्षल काटे यांसारखे तयारीतले खेळाडू आपल्या पीळदार देहयष्टीची किमया दाखविणार असल्याची माहिती किर्तीकर यांनी दिली. 

महेंद्र चव्हाण जेतेपदाचा प्रमुख दावेदार

दिवसेंदिवस शरीरसौष्ठव स्पर्धेचे ग्लॅमर प्रचंड वाढत असल्यामुळे उद्या भांडूप पश्चिमेला रंगणाऱ्या या क्लासिकल स्पर्धेला क्रीडाप्रेमींची प्रचंड गर्दी होणार असल्याचे भाकित बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी वर्तवले आहे. दोन वर्षांनंतर मुंबईत इतकी मोठी स्पर्धा होते आहे, ज्यात महाराष्ट्र शरीरसौष्ठवाची खरी पीळदार श्रीमंती मुंबईकरांना पाहायला मिळेल. प्रत्येक गटात गटविजेतेपदासाठी प्रचंड संघर्ष होणार असल्यामुळे प्रथमच होत असलेली मुंबई क्लासिक ग्लॅमरस आणि अविस्मरणीय होणार हे निश्चित आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुनील शेगडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी