CWG : १६ वर्षांची प्रतीक्षा संपली! भारतीय महिला हॉकी संघाने जिंकले पदक

CWG 2022: भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मोठे यश संपादन केले. भारतीय महिला हॉकी संघाने 16 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले आहे. भारतीय महिला हॉकी संघाने यापूर्वी 2006 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

The wait is over, Indian women's hockey team won medal in Commonwealth Games after 16 years
CWG : १६ वर्षांची प्रतीक्षा संपली! भारतीय महिला हॉकी संघाने जिंकले पदक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदकाच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला.
  • पेनल्टी शूटआऊटमध्ये किवी संघाचा 2-1 असा पराभव केला.
  • निर्धारित 60 मिनिटांत दोन्ही संघांनी 1-1 गोल केला होता.

CWG 2022: भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मोठे यश संपादन केले. भारतीय महिला हॉकी संघाने 16 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले आहे. भारतीय महिला हॉकी संघाने यापूर्वी 2006 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये हॉकीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडचा 2-1 ने पराभव केला आणि कांस्यपदकावर कब्जा केला.(The wait is over, Indian women's hockey team won medal in Commonwealth Games after 16 years)

अधिक वाचा : CWG 2022: दोन बॉक्सरने पटकावलं सुवर्णपदक, कॉमनवेल्थमध्ये भारताचा दबदबा

या मोठ्या विजयानंतर भारतीय महिला हॉकी संघाचा जल्लोष पाहण्यासारखा होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय महिला हॉकी संघ नृत्य करत आनंद साजरा करत आहे. भारतीय महिला हॉकी संघ 1997 च्या दस चित्रपटातील 'सुनो गौर से दुनिया वाला' गाण्यावर नाचताना दिसत आहे.

अधिक वाचा : Commonwealth Games 2022: कुस्तीत भारताची चमकदार कामगिरी, 3 Gold; रवी-विनेश-नवीन यांचा जलवा

सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर होता, परंतु शेवटच्या 30 सेकंदांपेक्षा कमी वेळात त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी कॉर्नर दिला. याचे रूपांतर पेनल्टी स्ट्रोकमध्ये झाले आणि ऑलिव्हिया मेरीने न्यूझीलंडला बरोबरी साधून दिली, त्यानंतर सामना शूट-आऊटमध्ये बरोबरीत सुटला. या सामन्यात भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी करत न्यूझीलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-1 असा पराभव केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी