T20 WC: धावा नाही बनल्या तर स्वत:ला संघातून वगळणार या संघाचा कर्णधार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 20, 2021 | 13:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या टीमचा कर्णधार इयॉन मॉर्गनने आपल्या बॅटिंग फॉर्मबाबत मोठे विधान केले आहे. मॉर्गनने म्हटले की जर त्याच्या न खेण्याने संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकण्यास मदत होत असेल तर तो स्वत:ला प्लेईंग ११ मधून ड्रॉप करेल. 

eoin morgan
T20 WC: धावा नाही झाल्या तर संघातून वगळणार या संघाचा कर्णधार 
थोडं पण कामाचं
  • मॉर्गनच्या नेतृत्वात केकेआर आयपीएलच्या फायनलला पोहोचली होती. 
  • न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यान मॉर्गन खेळण्याची आशा

मुंबई: इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयान मॉर्गनने आपल्या बॅटिंग फॉर्मबाबत मोठे विधान केले आहे. मॉर्गनने म्हटले की जर त्याच्या न खेळल्यामुळे संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकण्यास मदत होत असे तर तो स्वत:ला प्लेईंग ११मधून वगळण्यास तयार आहे. 

मॉर्गनचा सध्याचा फॉर्म हा वादाचा विषय ठरला आहे कारण इंग्लिश कर्णधाराने इंडियन प्रीमियर लीगमध्ये ११.०८च्या सरासरीने केवळ १३३ धावा बनवल्यात. त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने या हंगामात फायनलपर्यंत मजल मारली. इयॉन मॉर्गनने बीबीसीला सांगितले की, हा नेहमीच एक पर्याय असतो. मी वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाच्या रस्त्यात उभा रागत नाही आहे. माझ्या बॅटमधून धावा निघत नाही आहेत. मात्र माझे नेतृत्व चांगले आहे. मी नेहमीच या दोन गोष्टी वेगवेगळ्या मॅनेज केल्या आहेत. आणि दोन्हींना एक वेगवेगळे आव्हान म्हणून पाहिले आहे. 

मॉर्गनने सांगितले री जाहीरपणे के गोलंदाजी नाही होणे, थोडे वय वाढणे आणि मैदानात योगदान नाही दिल्यामुळे मला कर्णधारपदाची जबाबदारी घेण्यास आवडते. जर खराब फॉर्मातून बाहेर आलो नसतो तर मी येथे उभा नसतो. टी-२० क्रिकेटची प्रकृतीच अशी आहे. खासकरून जेथे मी बॅटिंग करण्यास जातो तेथे जोखीम घ्यावी लागते. अशाच गोष्टींचा सामना करून मी पुढे जातो. 

मॉर्गनने आपल्या नेतृत्वाखाली २०१९मध्ये इंग्लंडला ५० षटकांचा वर्ल्डकप जिंकून दिला होता. त्याच्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने भारताच्या जमिनीवर गेल्या टी-२० वर्ल्डकपमधये फायनलला पोहोचले होते. सोमवारी भारताविरुद्धच्या सराव सामन्यात मॉर्गनला आराम देण्यात आला होता. या सामन्यात जोस बटलरने नेतृत्व केले होते. दरम्यान, सामन्यात इग्लंडला भारताने ७ विकेटनी हरवले. यात राहुलने ५१ तर इशान किशनने ७० धावांची खेळी केली होी 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी