Hardik pandya: नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो...हार्दिक पांड्याने सांगितले पैशांचे महत्त्व

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 19, 2021 | 16:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

हार्दिकच्या मते टी-२० वर्ल्डकप त्याच्या करिअरमधील सगळ्यात मोठी जबाबदारी आहे कारण धोनीच्या अनुपस्थितीत फिनिशर म्हणून जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. 

hardik pandya
नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो - हार्दिक पांड्या 
थोडं पण कामाचं
  • पांड्याने पैशामुळे जीवनात आलेल्या बदलाबाबत सांगितले.
  • पांड्याने मान्य केले की तो कधीही परफेक्ट नव्हता.
  • मला माहीत आहे कीमाझ्यावर साऱ्यांच्या नजरा आहेत

मुंबई; भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने वर्ल्ड टी-२० वर्ल्डकपआधी आपल्या मनातील गोष्ट बोलून दिली. ईएसपीएन क्रिकइन्फो की क्रिकेट मंथलीला दिलेल्या मुलाखतीत पांड्याने आपल्या आयुष्यातील अनेक आव्हाने  आणि धोनीसोबतच्या असाधारण ताळमेळीबाबत गोष्टी मांडल्या. 

पैसा चांगली गोष्ट आहे

पांड्याने पैशामुळे जीवनात आलेल्या बदलाबाबत सांगितले. तो म्हणाा, माझ्यासाठी माझे कुटुंब महत्त्वाचे आहे. पैसा चांगली गोष्ट आहे. त्याने गोष्टी बदलून जातात. मी याचे एक उदाहरण आहे. नाहीतर आता मी पेट्रोल पंपावर काम करत असतो. जगाला माहीत आहे की हार्दिक अनेक कठीण परिस्थितीचा सामना करून येथवर पोहोचला आहे. 

पैशाने प्रेरणा मिळते

२०१९मध्ये मला कोणीतरी असे म्हटले होते की तुमच्यासारख्या तरूणांनी पैशासाठी जावू नननये. मात्र मी याच्याशी सहमत नाही. जेव्हा एखादा मुलगा गाव अथवा एखाद्या छोट्या शहरातून येतो आणि त्याला मोठे कॉन्ट्र्रॅक्ट मिळते तेव्हा तो पैसा केवळ आपल्यासाठी ठेवत नाही. तो आपल्या आईवडिलांची काळजी घेतो. पैशाने फरक पडतो आणि प्रेरणाही मिळते. 

कुटुंबाने केली मदत

पांड्याने मान्य केले की तो कधीही परफेक्ट नव्हता. मात्र त्याच्या कुटुंबियांनी त्याला मदत केली ज्यामुळे त्याचे पाय जमिनीवर राहतील. तो म्हणाला, मी माझ्या कमतारता मान्य करतो. करिअरच्या सुरूवातीला दोन वर्षे मी खूप भटकत होतो मात्र आमचे कुटुंबीय आम्ही एकमेकांच्या जवळ आहे. कुटुंबात एक गोष्ट स्पष्ट आहे की मी चुकीचा आहे तर चुकीचा आहे. प्रत्येकजण आपले मत देतो आणि जर कोणी भटकायला लागला तर पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करतात. 

फिनिशरची जबाबदारी खांद्यावर

मला माहीत आहे कीमाझ्यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. मला चर्चेत राहायला आवडत नाही. मात्र तसे होते. जेव्हा मी मैदानावर जातो तेव्हा साऱ्यांच्या नजरा माझ्यावर असतात. त्यांना माहीत आहे की मी फॉर्ममध्ये असलो तर एकट्याने सामना जिंकून देऊ शकतो.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी