Virat Kohli press conference Today: नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार विराट कोहली (Former captain Virat Kohli) आणि बीसीसीआय (BCCI) यामधील वाद पेटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात अलबेल नसल्याचे वृत्त माध्यमांमध्ये येत आहे. त्यात आज विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) केलेल्या खुलासामुळे बीसीसीआय आणि कोहलीचा वाद होण्याची शक्यता अधिक आहे.
भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधार पदावरुन हटवल्याची घोषणा केली होती. विराटने टी20 वर्ल्ड कपनंतर छोट्या फॉर्मेट म्हणजे टी20 च्या सामन्यांमध्ये कर्णधार राहणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु टी20 विश्व कपमधील सामन्यांदरम्यान भारतीय संघाची कामगिरी खराब होत असल्याने कोहलीकडून एकदिवशीय सामन्यांतील कर्णधारपद देखील काढून घेण्यात आलं.
अशा स्थितीत बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने सांगितले की, कसोटी संघाची घोषणा होण्याच्या सुमारे दीड तास आधी त्याला वन-डे कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कसोटी संघाच्या निवडीबाबत चर्चा केल्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला सांगितले की, तो यापुढे एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील, पण कर्णधारपदावरून हटवण्याबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही.
विराटने याबाबत सांगितले की, जेव्हा मी बीसीसीआयला टी-20 कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितले, तेव्हा ते स्वीकारले गेले. तू T20 चे कर्णधारपद सोडू नकोस असे मला कोणीही म्हटलं नाही. माझा हा निर्णय मंडळाने एक पुरोगामी पाऊल म्हणून स्विकारत योग्य दिशेने टाकलेले पाऊल असे म्हटले होते.
विराट पुढे म्हणाला, त्याचवेळी मी हे देखील स्पष्ट केले होते की, मला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून कायम राहायचे आहे. जोपर्यंत बोर्डाचे अधिकारी आणि निवडकर्त्यांना वाटत असेल तेव्हापर्यंत मी कर्णधार राहील. मला काय करायचे आहे ते माझ्या बाजूने पूर्णपणे स्पष्ट होते. मी निवडकर्त्यांना असा पर्यायही दिला होता की, जर त्यांना मला वनडे संघाचे कर्णधारपद नको असेल तर हा निर्णयही त्यांच्या हातात आहे. असे असताना निवडकर्त्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधाराची सूत्रे स्वीकारत रोहितला टी-२० नंतर वनडे संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले.
कर्णधारपदावरून हटवण्यामागच्या कारणाबाबत विराट म्हणाला, “आम्ही आयसीसी टूर्नामेंट न जिंकणे हे निश्चितच कारण आहे. मी कारण समजू शकतो. हा निर्णय योग्य आहे किंवा नाही यावर विवाद झाला नाही. बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे, त्यांनी ते तार्किक दृष्टिकोनातून घेतले आहे, जे मला समजू शकते, जे अस्थीर आहे