Indian Team: भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी हे खेळाडू प्रमुख दावेदार; मिडिल ऑर्डरची सांभाळणार धुरा 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 07, 2022 | 08:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Cricket Team | भारतीय क्रिकेट संघ आपल्या मजबूत फलंदाजीसाठी जगभर ओळखला जातो. संघाकडे रोहित शर्मा, विराट कोहली के.एल राहुल आणि ऋषभ पंत यांसारख्या आक्रमक फलंदाजांची फळी आहे, जे कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल बदलू शकतात.

These players could be selected for the middle order in the Indian team
भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी हे खेळाडू प्रमुख दावेदार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • आयपीएलमध्ये उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संघात दिली जाते.
  • भारतीय क्रिकेट संघ आपल्या मजबूत फलंदाजीसाठी जगभर ओळखला जातो.

Indian Cricket Team | मुंबई : भारतीय क्रिकेट संघ आपल्या मजबूत फलंदाजीसाठी जगभर ओळखला जातो. संघाकडे रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli), के.एल राहुल (K.L Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांसारख्या आक्रमक फलंदाजांची फळी आहे, जे कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल बदलू शकतात. दरम्यान आता भारतीय संघात (Team India) आणखी दोन खेळाडूंची एन्ट्री होऊ शकते, जे आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये शानदार लयनुसार खेळत आहेत. (These players could be selected for the middle order in the Indian team). 

अधिक वाचा : हा शेअर 3 रुपयांवरून पोचला 1300 रुपयांच्या पार, करोडोंचा नफा

मिडिल ऑर्डर करणार मजबूत 

दरम्यान, जेव्हा पासून महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी क्रिकेटला राम राम केले आहे, तेव्हापासून भारतीय संघाची मधली फळी विस्कळीत झाली आहे. कारण भारतीय संघ अद्याप संघातील चौथ्या क्रमाकांचा फलंदाज शोधण्यास अपयशी ठरला होता, मात्र आयपीएल २०२२ नंतर या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२२ मध्ये तिलक वर्मा (Tilak Varma) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) यांनी शानदार प्रदर्शन केले आहे आणि संघामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे हे खेळाडू भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

लखनऊने केली कमाल 

दिल्लीचा रहिवासी असलेल्या आयुष बदोनीने आयपीएल २०२२ मध्ये आपल्या खेळाने सर्वांच्या मनावर राज्य केले. त्याने लखनऊ सुपर जायंट्ससाठी (LSG) उल्लेखणीय कामगिरी केली. २२ वर्षीय आयुष बदोनीने आयपीएल २०२२ मध्ये १० सामन्यांत १३८ धावा केल्या आहेत आणि एक बळी देखील पटकावला आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याने केलेल्या धावा भलेही कमी असल्या तरी त्याने अनेक सामन्यांत संघाला कठीण स्थितीतून बाहेर काढले आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ५४ धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळू शकते. 

रोहितच्या नेतृत्वात चमकला हा खेळाडू 

मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आयपीएल २०२२ एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण मुंबईला सुरूवातीच्या ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, मात्र मुंबई इंडियन्ससाठी १९ वर्षीय युवा खेळाडू तिलक वर्माने चमकदार कामगिरी केली. तिलक वर्माने आयपीएल २०२२ मधील ९ सामन्यांत ३०७ धावा केल्या आहेत. तिलक वर्मा मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. रोहित शर्माच्या नेतृत्वात या खेळाडूने शानदार खेळी केली आहे. त्यामुळे त्याची भारतीय संघात निवड होऊ शकते, त्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी