IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टेस्टचे मैदान बदलणार, धरमशाला ऐवजी या ठिकाणी होणार मॅच

Third India vs Australia Test moved out of Dharamsala : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच आधी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होती. पण आता ही मॅच धरमशालात होणार नाही.

Third India vs Australia Test moved out of Dharamsala
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टेस्टचे मैदान बदलणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टेस्टचे मैदान बदलणार
  • धरमशाला ऐवजी या ठिकाणी होणार मॅच
  • तांत्रिक कारणामुळे होणार बदल

Third India vs Australia Test moved out of Dharamsala : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच आधी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होती. पण आता ही मॅच धरमशालात होणार नाही. मॅचसाठी इंदूर आणि राजकोटच्या मैदानाबाबत विचार सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय जाहीर होईल. 

धरमशाला येथील मैदानावर अलिकडेच काही बदल करण्यात आले. या बदलांनंतर इंटरनॅशनल मॅचसाठी धरमशालाचे मैदान तयार होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचा अंदाज आला. हा अंदाज आल्यामुळेच बीसीसीआयने धरमशालातील टेस्ट मॅच दुसऱ्या ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. 

धरमशाला ऐवजी तिसरी टेस्ट मॅच इंदूर आणि राजकोट यापैकी एका ठिकाणी होईल. अंतिम निर्णय पुढील काही दिवसांत जाहीर केला जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 2 टी 20 मॅच झाल्या. या मॅचनंतर धरमशालाच्या मैदानाचे आऊटफिल्ड आणि ड्रेनेज सिस्टिम या ठिकाणी काही बदल करण्याचा निर्णय झाला. हा बदल झाल्यानंतर त्याची तपासणी होऊन नियमानुसार मैदान आंतरराष्ट्रीय मॅचसाठी सज्ज होण्याकरिता जास्त वेळ लागणार आहे. या परिस्थितीचा अंदाज येताच बीसीसीआयने धरमशालातील टेस्ट मॅच दुसऱ्या ठिकाणी खेळवण्याबाबत विचार सुरू केला आहे.

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?

border-gavaskar trophy :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 200 पेक्षा जास्त रन बनवणारे खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

  1. गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 ते सोमवार 13 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली टेस्ट, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर - 1 डाव आणि 132 धावांनी भारताचा विजय
  2. शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी टेस्ट, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली - सकाळी 9.30
  3. बुधवार 1 मार्च 2023 ते रविवार 5 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी टेस्ट, नवे ठिकाण लवकरच जाहीर होणार - सकाळी 9.30
  4. गुरुवार 9 मार्च 2023 ते सोमवार 13 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी टेस्ट, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद - सकाळी 9.30
  5. शुक्रवार 17 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली वन डे, वानखेडे स्टेडियम मुंबई - दुपारी 2
  6. रविवार 19 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वन डे, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए - व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम - दुपारी 2
  7. बुधवार 22 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वन डे, एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई - दुपारी 2

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी