Team india captain: रोहित शर्माच्या वनडे कॅप्टन्सीसाठी धोकादायक ठरू शकतात हे २ क्रिकेटर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 11, 2021 | 16:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

team india captain: बीसीसीआयला २०२३मध्ये होणाऱ्या ५०ओव्हरच्या वर्ल्डकपआधी टी-२० आणि वनडे फॉरमॅटसाठी एकच कॅप्टन हवा आहे. अशातच कोहलीच्या वनडे कॅप्टन्सीच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

rohit sharma
रोहितच्या वनडे कॅप्टन्सीसाठी धोकादायक ठरू शकतात २ क्रिकेटर 
थोडं पण कामाचं
  • वनडेमध्ये टीम इंडियाच्या नेतृत्वासाठी सगळ्यात मोठा दावेदार रोहित शर्माला मानले जात आहे. मा
  • मात्र असे २ क्रिकेटर्स आहेत जे रोहित शर्माच्या वनडे नेतृत्वाच्या आड येऊ शकतात. 
  • बीसीसीआयला २०२३मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपआधी टी-२० आणि वनडे फॉरमॅटसाठी एकच कॅप्टन हवा आहे.

मुंबई: टी-२० वर्ल्डकपच्या(t-20 world cup 2021) ग्रुपमॅचमध्ये खूपच वाईट पद्धतीने बाहेर पडल्यानंतर टीम इंडियात(team india) मोठमोठे बदल पाहायला मिळत आहेत. रोहित शर्माला(rohit sharma) विराटच्या जागी टी-२०चा कर्णधार(t-20 captain) बनवण्यात आले आहे. विराट कोहलीने(virat kohli) टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय क्रिकेटच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडले होते. मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या वनडे नेतृत्वाबाबतही बीसीसीआय(bcci) लवकरच निर्णय घेऊ शकतो. बीसीसीआयला २०२३मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपआधी टी-२० आणि वनडे फॉरमॅटसाठी एकच कॅप्टन हवा आहे. अशातच येणाऱ्या दिवसांमध्ये कोहलीच्या नेतृत्वाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. 

वनडेमध्ये टीम इंडियाच्या नेतृत्वासाठी सगळ्यात मोठा दावेदार रोहित शर्माला मानले जात आहे. मात्र असे २ क्रिकेटर्स आहेत जे रोहित शर्माच्या वनडे नेतृत्वाच्या आड येऊ शकतात. 

केएल राहुल 

जर भारताला नवीन कॅप्टन बनवायचा असेल तर लोकेश राहुल चांगला पर्याय आहे. इंग्लंडमध्येही त्याची फलंदाजी चांगली होती. तो आयपीएलसह ५० ओव्हर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला खेळ करत आहे. पुढील टी-२० वर्ल्डकप २०२२मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. तर २०२३मध्ये भारत वनडे वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. अशातच राहुलकडे भारताचा पुढील कर्णधार होण्याची संधी असेल. लोकेश राहुल चांगला कॅप्टन, शानदार विकेटकीपर आणि जबरदस्त फलंदाज आहे. 

ऋषभ पंत

ऋषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडिया (Team India) पुढील कर्णधार बनू शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये पंतने टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली आहे. याच कारणामुळे तीनही फॉरमॅटमध्ये त्याने आपले स्थान पक्के केले आहे. ऋषभ पंतकडे एक स्मार्टनेस आहे. पंतमध्ये कर्णधार बनण्याचे सारे गुण आहेत. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना पंतने शानदार खेळ केला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी