Asia Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी रोहितची मोठी खेळी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 09, 2022 | 12:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Asia Cup 2022: बीसीसीआयने सोमवारी आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा संघाचा कर्णधार आहे. आशिया कपसाठी टीम इंडियात अनेक स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. 

team india
Asia Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी रोहितची मोठी खेळी 
थोडं पण कामाचं
  • माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पुन्हा फिट झालेला उप कर्णधार के एल राहुलचे आशिया कपसाठ निवडलेल्या १५ सदस्यी संघात पुनरागमन झाले आहे.
  • अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतमुळे संघाबाहेर गेला आहे.
  • राहुल आणि कोहलीच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा मजबूत झाली आहे.

मुंबई: बीसीसीआयने(bcci) सोमवारी आशिया कपसाठी(asia cup) टीम इंडियाची(team india) घोषणा केली. या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा(rohit sharma) करणार आहे. भारतीय संघ(indian team) आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध(pakistan) खेळणार आहे. आशिया कपसाठी टीम इंडियात अनेक स्टार खेळाडूंची एंट्री झाली आहे. खासकरून टीममध्ये असे दोन फलंदाज पुन्हा एकदा संघात खेळत आहेत जे जगातील सर्वात धोकादायक मानले जातात. हे दोन्ही खेळाडू भारताला आपल्या जोरावर आशिया कप जिंकून देऊ शकतात. This 2 players entry in team india for asia cup 2022

अधिक वाचा - ईपीएफओ ​​पेन्शनच्या नियमात होणार मोठा बदल, पाहा नवीन नियम

परतले हे दोन धोकादायक खेळाडू

माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पुन्हा फिट झालेला उप कर्णधार के एल राहुलचे आशिया कपसाठ निवडलेल्या १५ सदस्यी संघात पुनरागमन झाले आहे. तर अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतमुळे संघाबाहेर गेला आहे. राहुल आणि कोहलीच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा मजबूत झाली आहे. कोरोनामुळे राहुल वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील मालिकेत भाग घेऊ शकला नव्हता. स्पोर्ट्स हर्निया सर्जरीतून बरा झाल्यानंतर संघात त्याचे पुनरागमन झाले आहे. आशिया कप दुबई आणि शारजा येथे २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान खेळवला जाईल. 

कोहलीला फॉर्ममध्ये परतण्याची प्रतीक्षा

विराट कोहलीबाबत बोलायचे झाल्यास तो शेवटचा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. दरम्यान हा फलंदाज दीर्घकाळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे आणि त्याची नजर आता आशिया कपमध्ये पुनरागमन करण्याकडे असणार आहे. हा फलंदाज गेल्या तीन वर्षांपासून शतक ठोकू शकलेला नाही. अनेक महिन्यांपासून शतकापासून दूर राहिलेल्या विराटला धावा करणेही मुश्किल झाले आहे विराट लवकरात लवकर कमाल दाखवण्यासाठी उत्सुक आहे. खासकरून पाकिस्तानविरुद्ध त्याची बॅट खूप चालते. 

राहुलही फिट

दीर्घकाळापासून राहुल संघाबाहेर आहे. दुखापत आणि कोरोनामुळे हा फलंदाज क्रिकेटपासून दूर राहिला आहे. राहुल टीम इंडियाचा सगळ्यात भरवशाचा फलंदाज आहे. टीम इंडिया आणि त्याच्या उपस्थितीमुळे संघाची ताकद आणखी वाढली आहे. राहुल आशिया कपमध्ये रोहित शर्मासोबत डावाची सुरूवात करताना दिसेल. 

अधिक वाचा - मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

आशिया कपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंह, आवेश खान.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी