T-20 world cup: सुनील गावस्करांनी सांगितले टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाणाऱ्या २ टीम्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 29, 2021 | 16:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC T20 World Cup 2021 मध्ये यावेळेस कोणत्या दोन टीम्स जाणार याचा खुलासा सुनील गावस्कर यांनी केलाय. त्यांनी अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान टी-२० वर्ल्डकप सामन्याबबातही आपले मत दिले. 

sunil gavaskar
गावस्करांनी सांगितले वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाणाऱे २ संघ 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ आपापल्या ग्रुपच्या पॉईंट टेबलमध्ये मजबूत स्थितीत आहेत.
  • टी-२० हा प्रकार अफगाणिस्तानला खूप मदत करतो आणि त्यांचे फलंदाज षटकारांची बरसात करण्यास सक्षम आहेत.
  • पाकिस्तानला आज  ग्रुपमधील धक्कादायक संघ अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे.

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup)मध्ये दोन सामने खेळून दोन्हीमध्ये विजय मिळवणारे इंग्लंड(england) आणि पाकिस्तानचे(pakistan) संघ आपापल्या ग्रुपच्या पॉईंट टेबलमध्ये मजबूत स्थितीत आहेत. त्यांच्या विजयाच्या अंतराने दोन्ही संघाचा रनरेटही(run rate) चांगल्या स्थिती आहे. खेळाच्या या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ संतुलित दिसत आहेत. सध्याचा फॉर्म पाहता दोन्ही संघ फायनलिस्ट म्हणूनही दिसत आहेत. This 2 teams will enter in t-20 world cup final

पाकिस्तानला आज  ग्रुपमधील धक्कादायक संघ अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. टी-२० हा प्रकार अफगाणिस्तानला खूप मदत करतो आणि त्यांचे फलंदाज षटकारांची बरसात करण्यास सक्षम आहेत. अफगाणिस्तानच्या स्पिनर्सला तोड असणे खूप मुश्किल आहे आणि रशीद खान हा संघाकडे असा खेळाडू आहे ज्याला या प्रकारात प्रत्येक कर्णधार आपल्या संघात घेऊ इच्छितो. पाकिस्तानच्या संघाला हे माहीत आहे त्यामुळे ते हे स्वस्तात घेणार नाहीत. 

अन्य सामन्यांमध्ये मागील चॅम्पियन ठरलेल्या वेस्ट इंडिजकडे स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये दोन्ही सामने गमावलेत आणि आता त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची तलवार टांगती आहे. बांगलादेशकडे चांगले स्पिन आक्रमण आहे आणि विंडीजचेफलंदाज चांगल्या फलंदाजांसमोर आधीच संघर्ष करत असतात. दोन्ही संघांची समस्या म्हणजे टेम्परामेंटची कमतरता आणि गरजेपेक्षा अधिक उत्साहित होणे आहे. 

वेस्ट इंडिजचा संघ किरेन पोलार्ड, ड्वायेन ब्रावो, क्रिस गेल सारख्या अनुभवी क्रिकेटर्सवर अवलंबून असेल तर बांगलादेशला शाकिब अल हसन, महमदु्ल्लाह, मुशफिकुर रहीम यांच्या विजयावर विश्वास असेल. दोन्ही संघ हे जाणतात की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या सामन्यात जिंकणे किती गरजेचे आहे. अशातच हा सामना जबरदस्त होऊ शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी