मुंबई: भारतात क्रिकेटवेड्या(cricket) प्रेक्षकांची काही कमतरता नाहीये आणि चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूला हे चाहते देवाचाही दर्जा देण्यास कमी करत नाहीत. क्रिकेटच्या दुनियेत आपल्या खेळाच्या जादूने साऱ्यांनाच भुरळ घालणारे अनेक क्रिकेटर्स आहेत. या क्रिकेटर्सची नावे चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. क्रिकेटचीच दुनिया नव्हे तर विविध खेळांमधील अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांच्यामध्ये वापरली गेलेली जर्सी(jersy) नेहमीच त्या खेळाडूसह रिटायर झाली आहे. This 3 cricketers jersy retired, no one can wear this jersy
अधिक वाचा - या चार राशीच्या लोकांचे होणार भाग्योदय आणि अकस्माक धनलाभ
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्यूज जी जर्सी घालून मैदानात उतरत होता ती जर्सी एका हृदयद्रावक अपघातानंतर रिटायर झाली. २०१४मघ्ये एका डोमेस्टिक स्तरावरील क्रिकेटदरम्यान ह्यूजच्या डोक्यावर बॉल लागला होता. त्यानंतर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र तेथे त्याचे प्राण गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ह्यूजची जर्सी नंबर ६४ त्याच्या सन्मानार्थ नेहमीसाठी रिटायर केला. क्रिकेटच्या मैदानावर या नंबरची जर्सी कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या अंगावर दिसणार नाही.
नेपाळ क्रिकेट टीमचा दिग्गज कर्णधार पारसने ऑगस्ट २०२१मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. संघामध्ये त्याने दिलेले योगदान पाहता क्रिकेट बोर्डाने त्याला खास सन्मान देण्याचा निर्णय घेतला. पारसने नेपाळकडून खेळताना नेहम ७७ नंबरती जर्सी घातली आणि ही जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेतला. आता नेपाळच्या संघाकडून कोणताही खेळाडू ही जर्सी घालून मैदानावर उतरत नाही.
अधिक वाचा - RBI चा 'या' सहकारी बँकेला दणका, फक्त काढता येणार इतके पैसे
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वर्ल्ड क्रिकेटमध्ये दोन दशकाहून अधिक काळ राज्य केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतक आणि सर्वाधिक सामने खेळण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रचणाऱ्या सचिनला बीसीसीआयने सन्मानार्थ त्याची १० नंबरी जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेतला. २०१३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळल्यानंतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. त्यानंतर काही वर्षी शार्दूल ठाकूर ही जर्सी घालून मैदानावर खेळला. सचिनचा जर्सी नंबर खेळायला उतरल्याने बीसीसीआयवर लोकांनी जोरदार टीका केली. सोबतच शार्दूलवरही टीका झाली. यानंतर बोर्डाने ठरवले की ही जर्सी रिटायर केली जावी.