T-20 world cup: हे ३ खेळाडू ठरले टीम इंडियात फ्लॉप, करिअरही संपले?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 08, 2021 | 15:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cupमधून टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर टीम, विराट कोहली आणि निवड समितीवर सवाल केले जात आहेत. या टी-२० वर्ल्डकपमध्ये असे ३ खेळाडू आहेत ज्यांची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली. 

team india
हे ३ खेळाडू ठरले टीम इंडियात फ्लॉप, करिअरही संपले? 
थोडं पण कामाचं
  • भारत टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर
  • कोहली आणि निवड समितीवर केला जात आहेत सवाल

दुबई: T20 World Cupमध्ये रविवारी न्यूझीलंडने(new zealand) भारताचे(india) स्वप्न भंग केले. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला ८ विकेटनी हरवले आणि यानंतर टीम इंडियाचे टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. सोमवारी भारत(india) आणि नामिबिया(namibia) यांच्यातील सामना केवळ औपचारिकतेचा असणार आहे. तसेच कोहलीचा टी-२० चा कॅप्टन म्हणून शेवटचा सामना असणार आहे. this 3 players flop in t-20 world cup

यावेळी भारत पहिल्यांदा वर्ल्डकप(टी-२० आणि वनडे)मध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाला. त्यानंतर राहिलेली कसर न्यूझीलंडने पूर्ण केली. शास्त्री आणि त्यांच्या कोचिंग स्टाफचा हा शेवटचा सामना असणार आहे. टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडिया, विराट कोहली आणि निवड समितीवर सवाल उपस्थित केले जात आहेत. या टी-२० वर्ल्डकपमध्ये असे ३ खेळाडू आहेत ज्यांची कामगिरी खूपच खराब होती. 

वरूण चक्रवर्ती

वरूण चक्रवर्तीला टीम इंडियामध्ये स्थान देणे टीम इंडियाच्या निवड समितीची सर्वात मोठी चूक होती. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वरूण चक्रवर्तीला या टी-२० संघात स्थान देण्यात आले. मात्र स्पर्धा सुरू होताच त्याची पोलखोल झाली. वरूण चक्रवर्तीला टी-२० वर्ल्डकपमधील ३ सामन्यांमध्ये एकही विकेट मिळवता आला नाही. वरूण चक्रवर्तीला युझवेंद्र चहलसारख्या लेग स्पिनरच्या जागी संधी देण्यात आली. मात्र निवड समितीला या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होत असेल. वरूण चक्रवर्तीला पुन्हा टीम इंडियामध्ये स्थान मिळेल की नाही हे सांगणे कठीण आहे. 

भुवनेश्वर कुमार

३१ वर्षीय भुवनेश्वर कुमार आऊट ऑफ फॉर्म असतानाही सेलिक्टर्सनी त्याला टी-२० संघात स्थान दिले. हा निर्णय टीम इंडियाला भारी पडला. भुवनेश्वरला या सामन्यात केवळ पाकिस्तानविरुद्द खेळण्याची संधी मिळाली मात्र त्याला फलंदाजांनी चांगलाच धुतला.. यानंतर भुवीला न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग ११च्या बाहेर ठेवण्यात आले. टीम इंडियाच्या या चुकीमुळे भुवनेश्वर कुमारचे करिअर संपण्याच्या मार्गावर आहे.

हार्दिक पांड्या

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दीर्घकाळापासून फॉर्म आणि फिटनेसशी झुंज देत आहे. या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली. यानंतर त्याच्या स्थानावरून सवाल केले जाऊ लागले. हार्दिक पांड्याला कंटाळून लवकरच टीम मॅनेजमेंट दुसऱ्या एखाद्या ऑलराऊंडरला संधी देऊ शकते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी