Indian Cricket Team: हे ३ खेळाडू भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून खेळलेत क्रिकेट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 15, 2022 | 12:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Team: तीन क्रिकेटर्स असे होते ज्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांकडून क्रिकेट खेळला आहे. हे खेळाडू फाळणीनंतर पाकिस्तानात गेले होते. 

india vs pakistan
हे ३ खेळाडू भारत- पाकिस्तान दोन्ही देशांकडून खेळलेत क्रिकेट 
थोडं पण कामाचं
  • अब्दुल हाफीज कारदार यांना पाकिस्तानी क्रिकेटचे जनक मानले जाते.
  • आमिर ईलाही हे भारत आणि पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे दुसरे क्रिकेटर होते.
  • गुल मोहम्मद यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२१ला झाला. स्वातंत्र्याआधी ते भारतासाठी क्रिकेट खेळलेत.

मुंबई: सर्व भारतीय(indian) आज स्वातंत्र्याच्या(independance) ७५ वर्षांचा उत्सव साजरा करत आह. भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील क्रिकेट मॅचसाठी(cricket match) नेहमीच चाहते उत्सुक असतात. भारताला १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले होते. तर १४ ऑगस्टला पाकिस्तान(pakistan) स्वातंत्र झाला होता. भारताचे तीन क्रिकेटर्स असेही आहेत जे फाळणीनंतर पाकिस्तानात गेले आणि दोन्ही देशांकडून क्रिकेट खेळलेले आहेत. जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल...This 3 players played from india and pakistan

अधिक वाचा - 'या' मराठी सेलिब्रिटी कपलची लगीनघाई

अब्दुल हफीज कारदार 

अब्दुल हाफीज कारदार यांना पाकिस्तानी क्रिकेटचे जनक मानले जाते. अब्दुल हफीजचा जन् लाहोरच्या १९२५मध्ये झाले. ते पाकिस्तान क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार होते. त्यांनी भारतासाठी ३ कसोटी सामने आणि पाकिस्तानसाठी २३ कसोटी सामने खेळले. आपल्या करिअरमध्ये त्यांनी २६ कसोटी सामन्यांत ९२७ धावा केल्या आणि २१ विकेटही मिळवल्या. पाकिस्तानसाठी आपला पहिला कसोटी सामना अब्दुल यांनी भारताविरुद्द खेळला होता. कारदार यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने भारताला १९५२मध्ये लखनऊ कसोटीत हरवले होते. हाफीज हे त्यांच्या जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखले जात. 

आमिर ईलाही 

आमिर ईलाही हे भारत आणि पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे दुसरे क्रिकेटर होते. आमिरने १९४७मद्ये भारतासाठी एकमेव कसोटी सामना खेळला होता. यानंतर त्यांनी पाकिस्तानसाठी ५ कसोटी सामने खेळले. त्यांचे करिअर दीर्घकाळ चालले नाही. त्यांना केवळ ६ कसोटी सामन्यांत ७ विकेट मिळवल्या आणि ८२ धावा केल्या. डोमेस्टिक स्तरावरील क्रिकेटमध्ये ते यशस्वी ठरले होते आणि बडोदा संघाचे महत्त्वाचे खेळाडू होते. आमिर इलाही आपल्या लेग ब्रेकसाठी फेमस होते. 

अधिक वाचा - या फोटोत लपली आहे एक मुलगी, १५ सेकंदात दाखवा शोधून

गुल मोहम्मद 

गुल मोहम्मद यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२१ला झाला. स्वातंत्र्याआधी ते भारतासाठी क्रिकेट खेळलेत. मात्र फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले. गुल यांनी भारतासाठी १९६४ ते १९५२ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेत. १९५६मध्ये त्यांनी पाकिस्तानसाठी एकमेव कसोटी सामना खेळला. गुलने आपल्या करिअरमधील ९ कसोटी सामन्यांत २०५ धावा केल्या. रणजी ट्रॉफीमध्ये विजय हजारेसह त्यांची भागीदारी आजही लक्षात ठेवली जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी