भविष्यवाणीःऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरचा दावा, टी-२० वर्ल्डकपमध्ये हे चार संघ पोहोचणार सेमीफायनलला

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 22, 2021 | 13:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Brad Hogg's prediction for India in T20 World Cup 2021: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये टीम इंडियाचे काय होणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट ब्रॅड हॉगने याबाबतचा आपला दावा केला आहे.

team india
T-20 world cup: माजी क्रिकेटरचा दावा,हे चार संघ सेमीफायनलला 
थोडं पण कामाचं
  • टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी कशी होणार?
  • माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रॅड हॉगने केलाय मोठा दावा
  • हॉगने न्यूझीलंड क्रिकेट संघालाही दिला इशारा

मुंबई: पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकणारा भारतीय संघ पुन्हा एकदा हा प्रतिष्ठित खिताब जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पहिला खिताब जिंकून १४ वर्षे झाली आहेत. टीम इंडिया यावेळेस विराटच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया पुन्हा ते करणार का जे धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने केले होते. यावेळी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ पोहोचणार याबाबत ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरने दावा केला आहे. 

भारत-पाकिस्तान सामन्यासोबत २४ ऑक्टोबरला टी-२०वर्ल्डकप २०२१च्या सुपर १२ राऊंडलाही सुरूवात होईल. सुपर १२ राऊंडमध्ये दोन ग्रुप असतील. दोन्ही ग्रुपमध्ये ६-६ संघ असतील. 

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात 

भारत आणि पाकिस्तानला सुपर -12 च्या एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. हे दोन्ही संघ ग्रुप-2 मध्ये आहेत. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ देखील या गटात आहेत. तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला सुपर -12 च्या गट -1 मध्ये स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटात 6-6 संघ असतील. गटातील इतर संघांचे निर्णय विश्वचषक पात्रता फेरीच्या निकालांद्वारे निश्चित केले जातील.

टीम इंडियाबाबत काय म्हणाले हॉग

माझ्या हिशेबाने जे चार संघ टी-२० वर्ल्डकपमच्या सेमीफायनलमध्ये असतील ते म्हणजे ग्रुप १ मधून इंग्लंड आणि वेस्ट इंडीज. तर ग्रुप २मधून भारत आणि पाकिस्तान अंतिम चारमध्ये प्रवेश करतील. 

पाकिस्तानबाबत केले हे विधान

ब्रॅड हॉग म्हणाले पाकिस्तानच्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा अनुमान लावण्यासोबत ते म्हणाले की जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना रविवारी भारतीय संघाला हरवावे लागेल. तरच त्यांच्या आशा जिवंत राहतील. जर भारताने पाकिस्तानला हरवले तर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्या सेमीफायनलसाठी स्पर्धा सुरू होईल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी