Asia Cup: आशिया कपमध्ये या ५ कर्णधारांनी जिंकले सर्वाधिक सामने, लिस्टमध्ये एका भारतीयाचा समावेश

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 27, 2022 | 09:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

 Successful Captain In Asia Cup: आशिया कपची स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. भारताचे आशिया कपमधील अभियान येत्या २८ ऑगस्टपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होत आहे.

asia cup
आशिया कपमध्ये या ५ कर्णधारांनी जिंकले सर्वाधिक सामने 
थोडं पण कामाचं
  • भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत.
  • श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा कर्णधार आहे.
  • बांगलादेशने एकदाही आशिया कपचा खिताब जिंकलेला नाही. मात्र ते याच्या फायनलमध्ये जरूर पोहोचलेत.

मुंबई: भारताने सर्वाधिक ७ वेळा आशिया कपचा खिताब आपल्या नावे केला आहे. श्रीलंका संघाने पाच वेळा आणि पाकिस्तानने केवळ २ वेळा सामने जिंकले आहेत. आज आम्ही रिपोर्टमध्ये त्या पाच कर्णधारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. यात एका भारतीय कर्णधाराचा समावेश आहे. This 5 captains wins most matches in asia cup 

अधिक वाचा - अनिल परबांना झटका, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

MS Dhoni: भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने २०१० आणि २०१६मद्ये आशिया कप आपल्या नावे केला होता. धोनीने आशिया कपमधील १९ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे यातील भारतीय संघाला १४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 

अर्जुन रणतुंगा - श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा कर्णधार आहे. त्याने आशिया कपच्या १३ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. यात श्रीलंकेला ९ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. 

मश्रफे मुर्तझा - बांगलादेशने एकदाही आशिया कपचा खिताब जिंकलेला नाही. मात्र ते याच्या फायनलमध्ये जरूर पोहोचलेत. मश्रफे मुर्तझाने आशिया कपच्या ११व्या सामन्यात नेतृत्व केले आहे यात बांगलादेशला ६ मध्ये विजय मिळवला आहे. 

महेला जयवर्धने - महेला जयवर्धनेने आपल्या तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आशिया कपच्या १० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. यात श्रीलंकेच्या संघाला ६ सामन्यात विजय मिळाला. 

अधिक वाचा - पीएम किसानचा हप्ता घेणाऱ्या लाभार्थ्यांची घटली संख्या

मिसबा-उल-हक - मिसबाह उल हकची गणती पाकिस्तानच्या यशस्वी फलंदाजांमध्ये होते. त्याने आपल्या जोरावर पाकिस्तानी संघाला अनेक सामने जिंकून दिलेत. मिसबाहने १० सामन्यांत आशिया कपमध्ये पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले. यात ७ सामन्यांत विजय मिळाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी