मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या अंडर १९ क्रिकेटर्सना(india u19 cricketers) आयपीएलच्या लिलावात(ipl auction) चांगली रक्कम मिळाली आहे आणि यावेळेसही असे घडू शकते. १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव पार पडणार आहे. आयपीएलच्या माध्यमातून ज्युनियर खेळाडूंना(junior player) टीम इंडियामध्ये(team india) जागा मिळवण्याची संधी मिळते. आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. यामुळे आयपीएल लिलावादरम्यान त्यांना चांगली किंमत मिळू शकते. नजर टाकूया या ५ खेळाडूंवर This 5 cricketer can get good deal during ipl auction 2022
सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी भरवशाचा खेळाडू आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध सामन्यात ७९ धावा केल्या आणि त्यानंतर युगांडाविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकले. यामुले तो लिलावात जास्त डिमांड असलेल्या खेळाडूंपैकी एक असेल.
हरनूर सिंग या वर्षी भारताच्या अंडर १० संघातील सर्वात प्रभावी खेळाडूंमधील एक आहे. तो संघाचा प्रमुख फलंदाज आहे. त्याने नुकत्याच खेळवण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये तसेच अंडर १९ वर्ल्डकप २०२२मध्ये चांगल्या खेळी केल्या आहेत. या वर्ल्डकपदरम्यान भारताच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये ८८ धावांच्या खेळीसह तो संघाचा टॉप रन स्कोरर होता. यामुळे यात कोणतीच शंका नाही की हरनूर युवा फलंदाजांपैकी एक आहे ज्याच्यासाठी आयपीएलचे संघ मोठी बोली लावू शकतात.
राज बावा एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि हेच कारण आहे की तो आयपीएलसाठी सगळ्यात शानदार खेळाडू आहे. तो आरामात ३-४ ओव्हरची गोलंदाजी करू शकतो सोबतच एक चांगला फलंदाजही आहे. त्याने युगांडाविरुद्ध १६२ धावांची शानदार खेळी केली होती. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ४ महत्त्वाच्या विकेटही घेतल्या. ज्या फ्रेंचायझीला युवा ऑलराऊंडरची गरज आहे ते लिलावात बावासाठी जरूर बोलीलावतील यामुळे या युवा खेळाडूला चांगली डील मिळू शकते.
विकी ओस्तवाल सध्याचा भारताचा अंडर १९ संघाचा बेस्ट बॉलर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ बाद २८ असा शानदार स्पेल करत स्वत:ला सिद्ध केले होते. तो अंडर १९ वर्ल्डकप २०२२मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरू शकतो. अशातच तो आयपीएलच्या फ्रेंचायझींच्या नजरेत असणार.
यश ढूल भारताचा अंडर १९ संघाचा कर्णधार आहे आणि सर्व फॉरमॅटमध्ये खेळू शकतो. तो हरनूर सिंह इतका प्रभावी खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने शानदार फलंदाजी केली होती. मात्र दुर्देवाने तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि पुढील काही सामने खेळू शकला नाही. दरम्यान, त्याने आधीच आपले टॅलेंट दाखवले आहे आणि आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात अनेक फ्रेंचायझी त्याला आकर्षित करू शकतात.