मुंबई: क्रिकेट(cricket) हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय खेळ(sports) आहे. भारतात क्रिकेट खेळाला सर्वाधिक फॉलो केले जाते मात्र खेळाडूंसह त्यांच्या पत्नीही चाहत्यांमध्ये खूप फेमस असतात. क्रिकेटर्सच्या पत्नी एखाद्या सेलिब्रेटींपेक्षा(celebrity) कमी नसतात. आज आम्ही तुम्हाला अशा ५ क्रिकेटर्सच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या जोरावर संपूर्ण जगात आपली ओळख बनवली आहे. त्यांच्या पत्नीचे स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये खूप नाव आहे.
अधिक वाचा - अक्षय तृतीयेला खरेदी करा फक्त 1 रुपयात सोने...पाहा कसे
ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार ऑलराऊंडर शेन वॉटसनने २०१०मध्ये न्यू साऊथ वेल्समध्ये जन्मलेली फरलोंगशी लग्न केले होते. ली फरलोंग स्पोर्ट्स प्रेझेंटर, लेखिका,मॉडेल आणि बिझनेसवुमन आहे. लीने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमनध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. २०१८मध्ये लेखिकाही बनली आणि मुलांसाठी पुस्तके लिहीली. ऑस्ट्रेलियामध्ये लीचे मोठे नाव आहे.
भारताचा ऑलराऊंडर स्टुअर्ट बिन्नीने स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरसोबत २०१२ सप्टेंबरमध्ये लग्न केले होते. दोघांचीही भेट इंडियन क्रिकेट लीगदरम्यान झाली होती. मयंती लँगर भारतात प्रसिद्ध फिमेल अँकर्सपैकी एक आहे.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंडही स्पोर्ट्स अँकर आहे. एरिनने लग्नानंतर खुलासा केला होता की तो बेनला इन्स्टाग्रामवर भेटला आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढली. या जोडीने फेब्रुवारी २०२१मध्ये लग्न केले. दरम्यान कोरोना महामारीमुळे यांना दोनदा आपले लग्न रद्द करावे लागले होते.
न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज मार्टिन गप्टिलचे लग्न न्यूझीलंडची प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर लॉरा मॅकगोड्रिरकसोबत झाले होते. २०१४मध्ये मार्टिन आणि लॉरा मॅकगोड्रिरक यांनी एकमेकांशी लग्न केले. लॉरा मॅकगोड्रिरक पेशाने स्पोर्ट्स अँकर आहे. त्याशिवाय रेडिओ होस्ट, निवेदक, स्पोर्ट्स रिपोर्टर आणि अभिनेत्रीही आहे.
अधिक वाचा - ओळख करत शिक्षकाने शिक्षिकेवर केला बलात्कार
जसप्रीत बुमराहने संजना गणेशनसोबत मार्च २०२१मध्ये लग्न केले होते.संजना गणेशन एक प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. संजनाने वर्ल्डकप २०१९ दरम्यान स्टार स्पोर्ट्सचे अनेक फेमस शोज जसे मॅच पॉईंट आणि चीकी सिंगल्स होस्ट केले आहेत.