ICC World Test Championship Final: हे ५ क्रिकेटर होऊ शकतात रिटायर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 09, 2021 | 17:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

न्यूझीलंडविरुद्ध भारताची फायनल रंगणार आहे. त्यासाठी भारतीय संघ युकेमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ सध्या क्वारंटाईन आहे

team india
World Test Championship Final: ५ क्रिकेटर होऊ शकतात रिटायर 

थोडं पण कामाचं

  • या फायनलनंतर काही खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतात
  • ऋषभ पंतसमोर कदाचित वृद्धिमन साहाला संधी मिळण्याची शक्यता कमीच वाटते.
  • सध्या कसोटीचे सलामीवीर रोहित आणि गिल सोबत मयांक अग्रवालही या शर्यतीत असल्याने धवनसाठी कसोटीचे दरवाजे लांबच दिसत आहेत

मुंबई: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल काही खेळाडूंसाठी अखेरची स्पर्धा ठरू शकते. त्यामुळे या फायनलनंतर काही खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतात. न्यूझीलंडविरुद्ध भारताची फायनल रंगणार आहे. त्यासाठी भारतीय संघ युकेमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ सध्या क्वारंटाईन आहे.(This 5 cricketers may be retire after this ICC World Test Championship Final)

वृद्धिमन साहा - वृद्धिमन साहा सध्या भारतीय संघासोबत आहे. हा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट चॅम्पिशयनशिपसाठी युकेमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर तो पाच सामन्यांच्या मालिकेसाठीही संघात कायम राहणार आहे. दरम्यान, ऋषभ पंतसमोर कदाचित वृद्धिमन साहाला संधी मिळण्याची शक्यता कमीच वाटते. सहा महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत शेवटचा भारताकडून खेळला होता. ३६ वर्षीय क्रिकेटर भारताच्या बेस्ट वीकेटकीपर्सपैकी एक आहे. त्यामुळे साहाच्या जागी ऋषभ पंतला अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. 

शिखर धवन - मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्या शिखर धवन जबरदस्त फॉर्मात आहे. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. मात्र या क्रिकेटकरला कसोटी क्रिकेटमध्ये काही आपला फॉर्म दाखवता आलेला नाही. सध्या कसोटीचे सलामीवीर रोहित आणि गिल सोबत मयांक अग्रवालही या शर्यतीत असल्याने धवनसाठी कसोटीचे दरवाजे लांबच दिसत आहेत. २०१८मध्ये इंग्लंडविरुद्ध तो शेवटची कसोटी खेळला होता. मात्र त्यानंतर तो कसोटी संघाबाहेर आहे. 

इशांत शर्मा - हे सर्वांसाठीच फार धक्कादायक असेल मात्र हा वेगवान गोलंदाज आपल्या दुखापतीमुळे निवृत्त होऊ शकतो. इशांत शर्माच्या मागे दुखापतींचा ससेमिरा हा अजूनही काही थांबलेला नाही. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील महत्त्वाचा की फॅक्र आहे. हा गोलंदाजी जरी चांगला करत असला तरी त्याला आपल्या करिअरमध्ये दुखापतींनीच खूप हैराण केले. इशांतने १०० हून अधिक कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले असल्याने तो संघातील एक अनुभवी क्रिकेटर आहे. दरम्यान, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव सध्या चांगली कामगिरी करत असल्याने हा वेगवान गोलंदाज कदाचित फायनलनंतर रिटायर होऊ शकतो. 

मुरली विजय - मुरली विजय हा क्रिकेटर भारताच्या कसोटी संघातील एक भरवशाचा फलंदाज होता मात्र सध्या त्याला संघात स्थान नाहीये. त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळणे फारच कठीण दिसत आहे. तो डोमेस्टिक क्रिकेटही खेळत नाहीये. मुरली विजय आतापर्यंत ६१ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने ३९८२ धावा केल्या आहेत. तो २०१८मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 

दिनेश कार्तिक - दिनेश कार्तिकने आपले कसोटी करिअर एक विकेटकीपर बॅट्समन म्हणून सुरू केले. तो आतापर्यंत २६ कसोटी सामने खेळला आहे. याता त्याला केवळ १०२५ धावा करता आल्या तर केवळ एक शतक आणि सात अर्धशतके ठोकता आली आहेत. काही वर्षांपासून तो कसोटी क्रिकेट संघाच्या बाहेर आहे. त्यामुळे या फायनलनंतर दिनेशही निवृत्त होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी