मुंबई: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. यात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. क्रिकेटर्सच्या आयुष्यात बऱ्याचदा अनेक चढ-उतार येत असतात. कधी ते फॉर्ममध्ये असतात तर कधी ते दुखापतींनी ग्रस्त असतात. असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांच्या करिअरचा शेवट खूपच वाईट झाला आहे.
क्रिकेट इतिहासातील महान विकेटकीपर मार्क बाऊचरच्या करिअरचा शेवट दु:खद झाला. खरंतर, सामन्यादरम्यान इम्रान ताहिरने एक गुगली फेकली जी स्टम्पवर लागली आणि बेल उडताच दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मार्क बाऊचरच्या डोळ्याला लागली. या घटनेनंतर त्याला कायमचे क्रिकेट सोडावे लागले. त्याच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली होती.
अधिक वाचा - ट्रॅफिकमध्ये टाईमपाससाठी सचिनने धरला मराठी गाण्यावर ठेका
नवज्योतसिंह सिद्धू आपल्या काळातील सगळ्यात विस्फोटक फलंदाजांपैकी एक होता. मात्र त्याची निवृत्ती खूपच दुख:द होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार नवज्योतसिंह सिंद्धूला या गोष्टीने दुख पोहोचले होते की जेव्हा वाडेकर यांनी त्याला अनफिट सांगून त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संघात निवडले होते. हा खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन होता.
मोहम्मद कैफ आपल्या काळातील एक जबरदस्त फिल्डरपैकी एक होता. त्याने टीम इंडियासाठी अनेक ऐतिहासिक कामगिरी केल्या आणि अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये भारताला वाचवले आहे. मात्र ग्रेग चॅपेलच्या कोचिंगदरम्यान फलंदाजी क्रमात काही बदल करण्यात आले आणि त्याला २००७च्या वर्ल्डकपमधून बाहेर करण्यात आले. जेव्हा त्याला टीमबाहेर करण्यात आले तेव्हा त्याचे वय २६ होते. यानंतर तो पुनरागमन करू शकला नाही.
व्हीव्हीएस लक्ष्मणने अचानक निवृत्ती का घेतली याबाबत कोणालाच माहीत नाही. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार व्हीव्हीएस लक्ष्मण २०११च्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपले सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यात असफल ठरला. येथे त्याने ८ डावांत केवळ दोन अर्धशतक ठोकली. या दौऱ्यानंतर त्याच्यावर खूप टीका झाली. इतकं की मीडिया आणि क्रिकेट सहकाऱ्यांनीही त्याला सांगण्यास सुरूवात केली की त्याची निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे.
इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉटने खेळाचा दबाव आणि तणावापुढे हार मानली होती. २०१५मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एक मालिका गमावल्यानंतर ट्रॉटने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर ट्रॉटने खुलासा केला की त्याला एंझायटी इश्यूज आणि अनमॅनेज्ड स्ट्रेसमुळे हा निर्णय घेतला.
केविन पीटरसन इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज मानला जातो. या क्रिकेटरने २०१८मध्ये क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा करत साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या त्याच्या निर्णयाने त्याने चाहत्यांचे मन मोडले. असं म्हटलं जात की कर्णधार आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डासोबतच्या वादामुळे त्याला निवृत्ती घेण्यास भाग पाडले.
अधिक वाचा - Pushpa 2: पुष्पा 2 ची तयारी जोरात सुरू
झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज हेन्री ओलोंगा त्या खेळाडूंपैकी एक होता ज्याचे करिअर छोटे राहिले होते. २००३च्या वर्ल्डकपदरम्यान हेन्रीने झिम्बाब्वेमध्ये डेथ ऑफ डेमोक्रेसीच्या विरोधात आपल्या दंडावर काळी पट्टी बांधली होती. यानंतर त्याच्या देशाचे अधिकारी अटकेसाठी आले होते. यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.
जेम्स टेलर जगातील एक सर्वोत्कृष्ट फिल्डर आणि फलंदाजांपैकी एक होता. मात्र त्याच्या करिअरचा शेवट खूप दुख:द झाला. त्याला हृदयाच्या आजारामुळे केवळ २६व्या वयात क्रिकेटला निरोप द्यावा लागला होता.