IPL 2022 Auction: हार्दिक पांड्या ते बेन स्टोक्स, आयपीएल लिलावात हे पाच ऑलराऊंडर होऊ शकतात मालामाल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 07, 2022 | 16:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 auction: चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी चार चार खेळाडूंना रिटेन केले आहे. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबादने तीन-तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे तर पंजाब किंग्सने दोन खेळाडूंना रिटेन केले आहे. 

shardul thakur and hardik pandya
IPL 2022 Auction: लिलावात हे पाच ऑलराऊंडर होऊ शकतात मालामाल 
थोडं पण कामाचं
  • ऑलराऊंडर्सवर होऊ शकतो पैशांचा पाऊस
  • हार्दिक पांड्या, मिचेल मार्श, बेन स्टोक्स आणि सॅम करनचा समावेश
  • आयपीएलचा लिलाव फेब्रुवारीमध्ये

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(Ipl)च्या खेळाडूंचा लिलाव(auction) फेब्रुवारीमध्ये होणार आहे. लिलावाआधी २७ खेळाडूंना रिटेन(retain) करण्यात आले आहे. यात आठ परदेशी खेळाड आणि चार अनकॅप्ड आहेत. लिलावात नेहमीपासून ऑलराऊंडर क्रिकेटरर्सवर(allrounder cricketers) मोठी बोली लागते. यावेळीही लिस्टमध्ये असे काही ऑलराऊंडर्स असतील ज्यांच्या फ्रेंचायजी पैशांचा पाऊस करू शकतात. यात हार्दिक पांड्या, सॅम करन आणि मिचेल मार्श प्रमुख आहेत. This allrounder player can get more money in ipl 2022 auction

चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी चार चार खेळाडूंना रिटेन केले आहे. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबादने तीन-तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे तर पंजाब किंग्सने दोन खेळाडूंना रिटेन केले आहे. 

जाणून घ्या असे कोणते आहेत ५ ऑलराऊंडर्स ज्यांच्यावर मोठी बोली लागू शकते

हार्दिक पांड्या - भारताचा ऑलराऊंडर क्रिकेट हार्दिक पांड्या टी-२० वर्ल्डकप पूर्ण झाल्यानंतर दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. २८ वर्षीय अजूनही आपल्या रिहॅबिलिटेशनमध्ये आहे आणि त्याच्या पुनरागमनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तो आयपीएलसाठी स्वत:ला तयार करत आहे. रणजी ट्रॉफी नसल्याने हार्दिकला तयारीसाठी आता वेगळी मेहनत करावी लागेल. त्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले नाही. हार्दिकची मागील हंगामातील कामगिरी निराशाजनक होती. त्याने १२ सामन्यांमध्ये १४.११च्या सरासरीने १२७ धावा केल्या होत्या. त्यामुळे हार्दिक लिलावात गेल्यास मुंबईचा संघ त्याला खरेदी करतो की नाही हे पाहावे लागेल. 

मिचेल मार्श - ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्श सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी टी-२० वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी केली. संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली. मार्श सध्या बीबीएल २०२१-२२मध्ये चर्चेत आहे. आपीएल स्काऊट्सच्या नजार त्याच्यावर आहे. तो आयपीएल २०२२च्या मेगालिलावात महागडा खेळाडू म्हणून समोर येऊ शकतो. 

सॅम करन - चेन्नई सुपरकिंग्सचा माजी ऑलराऊंडर लिलावात फ्रेंचायझींच्या यादीत सगळ्यात वर असतील. करनने गेल्या हंगामात आपल्या कामगिरीने साऱ्यांना चकित केले होते. आयपीएलमध्ये त्याने ३२ सामन्यांमध्ये ३२ विकेट मिळवल्यात. तसेच त्याने ३३७ धावाही केल्यात. महेंद्रसिंग धोनीने त्याचा वापर ३ऱ्या नंबरवर केला होता. यावेळीही चेन्नईचा संघ त्याला जरूर खरेदी करण्याचा प्रयत्न करेल. 

शार्दूल ठाकूर - वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर गेल्या एका वर्षात ऑलराऊंडर म्हणून समोर आला आहे. त्याने स्वत:ला चेन्नई सुपरकिंग्स आण भारतीय संघात सिद्ध केले आहे. शार्दूलने गेल्या हंगामात २१ विकेट घेतल्या होत्या. धोनी नेहमीच आपल्या जुन्या खेळाडूंना संघात ठेवू इच्छितो. त्यामुळे चेन्नईचा संघ त्याच्यावर बोली लावू शकतो. 

बेन स्टोक्स -ऑलराऊंडर्सबाबत बोलायचे झाल्यास इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूचे नाव घ्यावेच लागेल. बेन स्टोक्स सध्याच्या काळातील जगातील बेस्ट ऑलराऊंडर आहे. तो काही काळ क्रिकेटपासून दूर राहिल्याने अॅशेस मालिकेत तो लयीमध्ये दिसला नाही. त्याला राजस्थान रॉयल्स संघानेही रिटेन केले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी