महान क्रिकेटरला झाली अटक, एक्स गर्लफ्रेंडसोबत केले घाणेरडे कृत्य

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 15, 2021 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

former cricketer arrest: क्रिकेटर्स जेवढे आपल्या खेळाबाबत चर्चेत असतात तेवढेच ते आपल्या पर्सनल लाईफबाबतही असतात. आता एका दिग्गज क्रिकेटरसोबत असे काही घडले आहे ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. 

arrest
former cricketer arrest: या महान क्रिकेटरला झाली अटक 
थोडं पण कामाचं
  • वाईट पद्धतीने अडकला हा क्रिकेटर
  • पोलिसांनी केली अटक
  • या क्रिकेटवर लगावलेत मोठे आरोप

मुंबई: क्रिकेटर्स(cricketers) जेवढे आपल्या खेळाबद्दल प्रसिद्ध असतात तितकेच ते आपल्या पर्सनल लाईफबाबतही असतात. अनेकदा हे क्रिकेटर्स मैदानावरील काही हरकतींमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. अनेकदा मैदानाच्या बाहेरही हे क्रिकेटर्स आपल्या कृत्यांमुळे मोठ्या समस्यांमध्ये अडकतात. असेच काहीसे एका दिग्गज क्रिकेटरसोबत घडले आहे. यामुळे मोठ्या आरोपांमुळे हा क्रिकेटर चांगल्याच वादात अडकला आहे. This australian cricketer arrested for domestic violence

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट तसेच सध्याचा कमेंटेटर मायकेल स्लेटरला या वर्षी ऑक्टोबरमध्ये घरगुती हिंसाचाराच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. मात्र बुधवारी १५ डिसेंबरला त्याला पुन्हा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की त्याने कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. 

मोठे आरोप

न्यू साऊथ वेल्स राज्याच्या पोलिसांनी सांगितले की मायकेल स्लेटरला बुधवारी सकाळी दुसऱ्यांदा अटक करण्यात आली होती. त्याला सिडनी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथे त्याला जामीन देण्यास नकार देण्यात आला. ऑस्ट्रेलिया मीडियाच्या माहितीनुसार ५१ वर्षीय क्रिकेटवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका प्रकरणात पोलिसांनी सिडनी येथून त्याला अटक केली होती येथून त्याला कोर्टातसादर करण्यात आले होते. 

क्रिकेटमध्ये स्लेटरचे मोठे नाव

माजी सलामीवीर मायकेल स्लेरने ऑस्ट्रेलियासाठी तब्बल १० वर्षे क्रिकेट खेळला. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५३१२ धावा आहेत. त्याने २००४मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो कमेंट्री करू लागला. स्लेटरवर घरगुती हिंसाचाराचा आरोप आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी