IPL Auction 2022: जे आतापर्यंत नाही घडलं ते आता होणार, २० कोटींपार जाणार या खेळाडूंची बोली

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 26, 2022 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL: एकूण १२१४ खेळाडूंनी लिलावासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. आयपीएलध्ये यावेळेस दोन नवे संघ सामील केले आहेत. त्यामुळे या फ्रेंचायझी खेळाडूंना आपल्यासोबत जोडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करतील. 

ipl
आयपीएल लिलावात जे आतापर्यंत नाही घडलं ते आता होणार 
थोडं पण कामाचं
  • यंदाचा आयपीएल असणार खास
  • या लिलावात खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता
  • २० कोटींपेक्षाही अधिक मिळू शकते किंमत

IPL Auction: इंडियन प्रीमियर लीग(IPL 2022)च्या मेगा लिलावासाठी(mega auction) आता जास्त दिवस बाकी राहिलेले नाहीत. बीसीसीआयने(bcci) १२ आणि १३ फेब्रुवारीला लिलाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण १२१४ खेळाडूंनी लिलावासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. आयपीएलमध्ये आता दोन नव्या संघांचा समावेश होतोय. यानंतर या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी प्रत्येक संघात स्पर्धा पाहायला मिळेल. आता हे पाहावं लागेल की यावेळेस कोणता खेळाडू महागडा ठरू शकतो. गेल्या वर्षी ऑलराऊंडर क्रिस मॉरिसने इतिहास रचताना १६.२५ कोटींना विकला गेला होता. त्यांना राजस्थान रॉयल्सने खरेदी केले होते. तर यावर्षी लिलावात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू असतील आणि आशा केली जात आहे की त्याची बोली २० कोटीपेक्षा अधिकलाही लागू शकते. This can happen in this ipl auction 2022

डेविड वॉर्नर - ऑस्ट्रेलियाचा हा सलामी फलंदाज सध्याच्या घडीचा सर्वाधिक विस्फोटक फलंदाज आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या यादीत पाचव्या स्थानाव आहे. वॉर्नरकडे नेतृत्वाचाही अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबाद २०१६मध्ये आयपीएलचा खिताब जिंकला होता. दरम्यान, सनरायजर्सनेआता त्याला रिलीज केले आहे. त्यामुळे वॉर्नरला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायझींमध्ये स्पर्धा लागेल. 

अधिक वाचा - ज्येष्ठ नागरिकांना सरकार देतेय दमदार पेन्शन, तेही सहजरित्या

मिचेल मार्श - ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मर्यादित षटकांच्या फॉरमटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये धमाल करतो. टी-२०मध्ये तो सातत्याने ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी करत आहे. यात कोणतीही शंका नाही की मार्शला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायझींना मोठी मेहनत करावी लागेल. तो २० कोटींपेक्षा अधिक किंमतीला विकला जाऊ शकतो. 

पॅट कमिन्स - पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. तो जगातील पहिला गोलंदाज आहे. टी-२०मध्ये त्याची कामगिरी चांगली झाली आहे. आयपीएल २०२०मध्ये केकेआरने त्याला १५.५० कोटींना खरेदी केले होते. दरम्यान फ्रेंचायझीने त्याला २०२१मध्ये रिलीज केले. कमिन्स यावेळेला २० कोटींपेक्षा अधिक किंमतीला विकला गेल्यास आश्चर्य वाटायला नको. 

क्विंटन डी कॉक - दक्षिण आफ्रिकेच्या या विकेटकीपर फलंदाजांने नेहमी दाखवून दिले आहे की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो सर्वोत्कृष्ट फलंदाजामध्ये एक आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक शॉट आहेत. डीकॉकने नुकतेच  टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शतक ठोकले होते. या खेळीनंतर त्याची आयपीएल लिलावातील त्यांची किंमत आणखी वाढू शकते. 

अधिक वाचा - आज राज्यात आढळले कोरोनाचे ३३ हजारहून अधिक रुग्ण

ट्रेंट बोल्ट - न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आयपीएलच्या मागच्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होते. फ्रेंचायझीने त्यांना रिलीज केले आहे. बोल्ट गेल्या दोन हंगामात मुंबईचा यशस्वी गोलंदाज होता. तो जगातील सर्वोत्कृष्ट डाव्या हाताच्या गोलंदाजांपैकी एक आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी