IND vs SA T20 | मुंबई : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. भारताचे चौथ्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाचा दारूण पराभव करून ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. दरम्यान आता उद्याच्या पाचव्या निर्णायक टी-२० सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी कर्णधार ऋषभ पंत काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे त्यामुळे काहीं खेळाडूंचा संघातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. (This could be India's playing XI for the fifth decisive T20 match).
अधिक वाचा : ऐकावं ते नवलच! भारतातील या गावात उलट्या दिशेने चालते घड्याळ
ईशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत शानदार खेळी केली आहे. तर तिसऱ्या टी-२० सामन्यात ऋतुराज गायकवाडने आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे पाचव्या सामन्यात या दोघांची सलामी जोडी असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जावू लागू शकते. कारण अय्यर सध्या खूपच खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याच्या जागेवर दिपक हुड्डाला संधी मिळू शकते.
चौथ्या नंबरसाठी कर्णधार ऋषभ पंत असणार हे निश्चित आहे. तर हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळेल. चौथ्या सामन्यात दिनेश कार्तिकने तुफानी खेळी केली. अशा स्थितीत तो खेळणार याची खात्री आहे. कार्तिककडे सामना फिनिश करण्याची सर्वोत्तम कला आहे.
पाचव्या टी-२० सामन्यामध्ये भुवनेश्वर कुमारला संधी दिली जाऊ शकते. मागील सामन्याचा हिरो राहिलेला आवेश खान पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवताना दिसेल. डेथ ओव्हरमध्ये घातक गोलंदाजी करणाऱ्या हर्षल पटेलला संघात स्थान मिळू शकते. युझवेंद्र चहल फिरकीची जबाबदारी सांभाळेल, त्याचबरोबर अक्षर पटेलच्या जागी रवी बिश्नोईला संधी दिली जाऊ शकते.
ऋषभ पंत (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, दिपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान. युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई,