Team india: अचानक झाला निर्णय, या फलंदाजाला भारतीय कसोटीत सामील केले - रिपोर्ट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 23, 2021 | 13:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahul dravid master stroke against new zealand test series: लवकरच सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेआधी एक खेळाडूचा संघात समावेश केला जाणार आहे. हा निर्णय अचानक घेण्यात आला आहे. 

suryakuamar yadav
अचानक झाला निर्णय, या फलंदाजाला भारतीय कसोटीत सामील केले 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. 
  • कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारतीय कसोटी संघात नवी एंट्री?
  • रिपोर्टममध्ये झाला खुलासा, हा खेळाडू करू शकतो पदार्पण

Indian squad for Test series against New Zealand: कानपूरमध्ये(Kanpur) गुरुवारपासून सुरु होणाऱ्या भारत-न्यूझीलंड(india- new zealand) कसोटी मालिकेआधी(test series) एक मोठी बातमी समोर आली आहे. यजमान भारताच्या कसोटी संघात नव्या नावाची एंट्री होऊ शकते. एका ताज्या रिपोर्टनुसार टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेनंतर सूर्यकुमार यादवला(suryakumar yadav) न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान दिले जाऊ शकते. या मालिकेसोबत सूर्यकुमार कसोटीत पुनरागमन करत आहे. This cricketer can be included in test match team

मिड डेच्या रिपोर्टनुसार एका सूत्राने सांगितले की सूर्यकुमार कसोटी संघात पुनरागमन करत आहे. तो कोलकातावरून सरळ कानपूरला जाऊन संघात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवला इंग्लंड दौऱ्याच्या वेळेस पृथ्वी शॉसोबत भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. दरम्यान, दोन्ही खेळाडू त्यावेळेस श्रीलंकेत मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळत होते आणि ते पहिल्या दोन कसोटीसाठी उपलब्ध नव्हते. 
यानंतर जेव्हा ते इंग्लंडला पोहोचले तेव्हा नियमानुसार त्यांना १० दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागले. त्यानंतर दुसऱ्या कसोटीदरम्यान भारतीय संघासोबत जोडले गेले. मात्र शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याला अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आले नाही.

जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा सूर्यकुमारला संघाता जागा देण्यात आली नाही तर पृथ्वी शॉला इंडिया ए संघाचा हिस्सा बनवीन दक्षिण आफ्रिकेत गैरअधिकारिक कसोटी मालिकेसाठी पाठवण्यात आले. 

सूर्यकुमार यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप धमाल केली आहे. मात्र आता त्याला टेस्ट इलेव्हनमध्ये सामील होण्याची प्रतीक्षा आहे. आता हे पाहावे लागेल की न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला संधी मिळतेय की नाही. त्याची टक्कर श्रेयस अय्यरशी आहे. अय्यरलाही आतापर्यंतकसोटीत प्लेईंग ११मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. 

न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया - अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी