IND vs ZIM: कोच राहुल द्रविडची जबरदस्त खेळी, टीम इंडियात परतला युवराजसारखा घातक फलंदाज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 17, 2022 | 18:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs ZIM: भारतीय संघ १८ ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भिडणार आहे. अनेक खेळाडू तर झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण करताना दिसतील. अशातच एका धोकादायक फलंदाजाबद्दल आम्ही सांगत आहोत...

rahul dravid
IND vs ZIM: कोच राहुल द्रविडची जबरदस्त खेळी 
थोडं पण कामाचं
  • झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत ३१ वर्षीय एक फलंदाज पदार्पण करू शकतो.
  • हा खेळाडू आणखी कोणी नव्हे तर आयपीएलमध्ये आपला दम दाखवणारा राहुल त्रिपाठी आहे.
  • गेल्या दोन मालिकेपासून एका संधीची प्रतीक्षा  करत असलेला राहुल झिम्बाब्वेविरुद्ध प्लेईंग ११मध्ये सामील केला जाऊ शकतो

मुंबई: टीम इंडिया(team india) येत्या  १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध(india vs zimbawbe) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत(one day series) भिडणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केएल राहुलच्या(Kl rahul) हाती सोपवण्यात आले आहे तर शिखर धवन(shikhar dhawan) उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघ या मालिकेसाठी तरूणवर्गाने सजला आहे. अनेक खेळाडू तर झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना दिसू शकतात. अशातच एका धोकादायक फलंदाजाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत...This cricketer enter in team india squad for Zimbabwe series

अधिक वाचा - कृष्णजयंतीनिमित्त कृष्ण भक्तांना द्या मराठीतून शुभेच्छा

पदार्पणासाठी तयार आहे हा खेळाडू

झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत ३१ वर्षीय एक फलंदाज पदार्पण करू शकतो. हा खेळाडू आणखी कोणी नव्हे तर आयपीएलमध्ये आपला दम दाखवणारा राहुल त्रिपाठी आहे. गेल्या दोन मालिकेपासून एका संधीची प्रतीक्षा  करत असलेला राहुल झिम्बाब्वेविरुद्ध प्लेईंग ११मध्ये सामील केला जाऊ शकतो. हा खेळाडू दीर्घकाळापासून संधीची वाट पाहत आहे. मात्र सध्याचा संघपाहता झिम्बाब्वेच्या धरतीवर हा खेळाडू आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 

इंग्लंड-आयर्लंडमध्ये बसावे लागले होते बाहेर

राहुलला इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध बाहेर बसावे लागले होते. टीम इंडियाने नुकताच इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला होता. राहुल त्रिपाठी या दोन्ही दौऱ्यावर टीम इंडियाचा स्क्वाडचा भाग होोता मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यावर मिडल ऑर्डरमध्ये राहुल असल्याने टीम इंडियाला मजबूती मिळेल. तो दीपक हुड्डा आणि इशान किशनसोबत मिळून कमाल करू शकतो. 

आयपीएलमध्ये केली होती कमाल 

राहुल त्रिपाठी आयपीएलमध्ये सलामीवीर  आणि खालच्या फळीतही फलंदाजी करू शकतो. आयपीएल २०२२मध्ये राहुल त्रिपाठी खूप यशस्वी झाला होता. या हंगामात त्याने १४ सामन्यांमध्ये ४१४ धावा केल्या. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याला संघात स्थान मिळाले आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ७६ सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याच्या नावावर १७९८ धावा आहेत. आशा आहे की भारतासाठी हा खेळाडू टी-२० फॉरमॅटमध्ये खेळताना दिसू शकतो. 

अधिक वाचा - मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

३ वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ

केएल राहुल (कर्णधार) शिखर धवन (उपकर्णधार), ऋुतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी