T20 World Cup: वेगळ्या ग्रहावरून आलाय हा खेळाडू, या भारतीयाची बॅटिंग पाहून PAK क्रिकेटरने केली कमेंट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 07, 2022 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pak cricketer: टी20 वर्ल्ड कप 2022 दरम्यान पाकिस्तानच्या दिग्गजांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूचे कौतुक करताना म्हटले की हा खेळाडू दुसऱ्या ग्रहावरून आला आहे. 

suryakuamar yadav
वेगळ्या ग्रहावरून आलाय हा खेळाडू, PAK क्रिकेटरने केली कमेंट 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाने सुपर 12च्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता.
  • या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने एक तुफानी खेळी केली होती.
  • सूर्यकुमारचा हा शॉट पाहून पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हैराण झाला

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022(t-20 world cup 2022) च्या सेमीफायनलमधील सामने 9 आणि 10 नोव्हेंबरला खेळवले जातील. पहिल्या सेमीफायनलमध्ये(semifinal) पाकिस्तानचा(pakistan) सामना न्यूझीलंडविरुद्ध(new zealand) होणार आहे तर टीम इंडिया(team india) इंग्लंडविरुद्ध खेळणार(england) आहे. या मोठ्या सामन्याआधी पाकिस्तानच्या दिग्गजांना टीम इंडियाच्या या खेळाडूची भीती वाटत आहे. या दिग्गजाचे म्हणणे आहे की टीम इंडियाचा हा खेळाडू दुसऱ्या ग्रहावरून आला आहे. This cricketer from another planet says pak cricketer about surya kumar yadav

अधिक वाचा -गुरु नानक जयंती निमित्त मराठीतून द्या शुभेच्छा

 पाकिस्तानच्या दिग्गजांना सतावतेय भीती

टीम इंडियाने सुपर 12च्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने एक तुफानी खेळी केली होती. या खेळीदरमयान त्याने एक शॉट फुल टॉस डिलीव्हरीविरुद्ध फाइन लेगवर लावला होता. हा शॉट पाहून पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हैराण झाला. इतकंच नव्हे तर वकार युनिसने सूर्यकुमार यादव हा दुसऱ्या ग्रहावरचा असल्याचे म्हटले. 

गोलंदाजासाठी ठरतोय काळ

वसीम अक्रमने सामन्यादरम्यान ए स्पोर्ट्सवर म्हटले, मला वाटते की सूर्यकुमार यादव वेगळ्या ग्रहावरून आला आहे. तो इतरांपेक्षा वेगळा खेळाडू आहे. त्याने जितक्या धावा केल्या आहेत त्या केवळ झिम्बाब्वेविरुद्ध नव्हे तर जगातील इतर गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध केल्या आहेत आणि हे पाहण्यासारखं आहे. तर वकार युनुसमे म्हटले की सूर्यकुमार यादवविरुद्ध गोलंदाजीची योजना बनवणे कठीण आहे बॉलर जाईल तर कुठे जाईल?

2022मध्ये ठोकल्या सर्वाधिक धावा

2022 या वर्षात सूर्यकुमार यादवने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव ICC टी20 रँकिंगमध्ये नंबर वन फलंदाज आहे. यासोबतच 2022मध्ये टी20क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. एका वर्षात  टी20 क्रिकेटमध्ये 1000  धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने 25 बॉलमध्ये 61 धावा केल्यात यात त्याने 6 चौकार आणि 4 लांब सिक्सर ठोकले. 

अधिक वाचा - या तीन आजारांमध्ये तुपाचे सेवन असते विषासमान, पाहा कसे

2022 च्या T20 वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादव फॉर्मात आहे. त्याने नेदरलँडविरुद्ध 51 धावा, द. आफ्रिकेविरुद्ध 68 धावा आणि आता झिम्बाब्वेविरुद्ध 61 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने T20 विश्वचषक 2022 च्या 5 डावात 225 धावा केल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी