Account hack: या क्रिकेटरचे पत्नीसोबतचे प्रायव्हेट चॅट झाले व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 02, 2022 | 14:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cricketer account hack: टीम इंडियाचा स्पिनर युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. सोशल मीडियावर त्याचे प्रायव्हेट चॅटचा स्क्रीनशॉट लीक झाला आहे. 

instagram account
या क्रिकेटरचे पत्नीसोबतचे प्रायव्हेट चॅट झाले व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याची कामगिरी इतर कोणी नव्हे तर त्याचा आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्सने केली आहे
  • दरम्यान, हे सगळे मजेने केले आहे.
  • राजस्थान रॉयल्सने ट्वीट करत युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याची माहिती दिली आहे

मुंबई: टीम इंडियाचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल(team india spinner yuzvendra chahal) सध्या ब्रेकवर आहे. चहल वेस्ट इंडिज दौऱ्यात(west indies tour) टीम इंडियाचा भाग नाही आहे. यातच आता युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक(instagram account hack) झाले आहे. या घटनेची माहिती अकाऊंट हॅक करणाऱ्याने ट्वीटच्या(tweet) माध्यमातून दिली आहे. इतकंच नव्हे तर प्रायव्हेट चॅटचे स्क्रीनशॉटही(screenshot) पब्लिक केला आहे. हा फोटो खूप व्हायरल होत आहे. this cricketer instagram account hack, private chat viral on social media

अधिक वाचा - एका माणसाने गिळले एक रुपयांचे एवढे कॉईन्स, पहा फोटो

युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याची कामगिरी इतर कोणी नव्हे तर त्याचा आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्सने केली आहे. दरम्यान, हे सगळे मजेने केले आहे. राजस्थान रॉयल्सने ट्वीट करत युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याची माहिती दिली आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे यात युझवेंद्र चहलच्या प्रायव्हेट चॅटचा स्क्रीनशॉट दिसत आहे.

चहलचे प्रायव्हेट चॅट झाले लीक

राजस्थान रॉयल्सने ट्विटरवर युझवेंद्र चहलच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहे. यात पत्नी धनश्री वर्मा, संजू सॅमसन, महेंद्रसिंग धोनी, जोस बटलर, भारतीय क्रिकेट संघ आणि रोहित शर्माच्या अकाऊंटमधून करण्यात आलेला शेवटचा मेसेज दिसत आहे. युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने लिहिले की शेवटची आहे का की तुम्ही परत आलाय व्हिडिओमध्ये तर रोहित शर्माने हे ही लिहिले की अकाऊंट डिलीट करावे. युझवेंद्र चहलच्या चॅटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा - होणार दूध का दूध और पानी का पानी; पोलिसांनी मागवला मूळ ऑडिओ

राजस्थान रॉयल्सचे अकाऊंटही झाले होते हॅक

आयपीएल २०२२ दरम्यान युझवेंद्र चहलनेही राजस्थान रॉयल्सचे ट्विटर अकाऊंट हॅक केले होते. युझवेंद्र चहलने खुद्द टीमचा नवा कर्णधार झाल्याचे म्हटले होते. चाहत्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. इतकंच की संघाचा कर्णधार मानल्या जाणाऱ्या संजू सॅमसननेही चहलला शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर हा खुलासा झाला होता की ही थट्टा युझवेंद्र चहलने केली आहे. चहलने खुद्द ट्विटरवर ही घोषणा केली की तो संघाचे अकाऊंट हॅक करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी