T-20: टी-२० क्रिकेटमध्ये चमत्कार: या गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये पडल्या ६ विकेट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 13, 2022 | 17:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुम्ही याला चमत्कार समजा अथवा योगायोद. मात्र क्रिकेटच्या इतिहासात तुम्ही हे ऐकले नसेल. एका ओव्हरमध्ये तीन-चार नाही तर सहा विकेट पडल्या. 

cricket
टी-२० चमत्कार: या गोलंदाजाने १ ओव्हरमध्ये घेतल्या ६ विकेट 
थोडं पण कामाचं
  • सिंह शेवटची ओव्हर टाकण्यासाठी मैदानात आला.
  • मलेशिया क्लब इलेव्हन आणि पुश स्पोर्ट्स दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात
  • एका वेळेस पुश स्पोर्ट्सचा स्कोर तीन बाद १३१ असा होता.

मुंबई: मलेशियाचा विकेटकीपर विरनदीप सिंहनेन कमालीची ओव्हर फेकली. अशा ओव्हरची कोणी कल्पनाही केली नसेल. त्याच्या या ओव्हरमधील प्रत्येक बॉलवर विकेट पडली. हे नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिपमध्ये घडले. सिंहने मलेशियासाठी २९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो कधी कधी डाव्या हाताने गोलंदाजीही करतो. मलेशिया क्लब इलेव्हन आणि पुश स्पोर्ट्स दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात ही कामगिरी घडली. एका वेळेस पुश स्पोर्ट्सचा स्कोर तीन बाद १३१ असा होता. ही त्यांच्या डावातील शेवटची ओव्हर होती. 

अधिक वाचा - मच्छरांनी तुम्हालाही केले आहे हैराण, तर करा हे ५ घरगुती उपाय

सिंह शेवटची ओव्हर टाकण्यासाठी मैदानात आला. त्याचा पहिला बॉल वाईड गेला. त्यानंतर पुश स्पोर्ट्सने शेवटच्या ६ बॉलवर ६ विकेट पडल्या. सर्वात आधी मृगांक पाठक ३९ धावा करून अहमद फैजच्या हाती कॅच देत बाद झाला. पुढील बॉलवर इशान पांडे १९ धावा करून रनआऊट झाला. 

यानंतर सिंहने पुढील चार बॉलवर चार विकेट घेतल्या, एडिनो नहारेला सिंहने वेगाने टर्न होणाऱ्या बॉलवर बोल्ड केले. यानंतर विशेष सरोहाही मोठा शॉट खेळण्याच्या नादात बोल्ड झाला. 

अधिक वाचा - दक्षिण दिशेला चुकूनही लावू नका ही झाडे

सिंहने जतिन सिंघलला बाद करत अविस्मरणीय हॅटट्रिक पूर्ण केली. त्याने सिंघलला आपल्याच बॉलवर कॅच आऊट केले. यानंतर डावाच्या शेवटच्या बॉलवर त्याने स्पर्शला बोल्ड केले. गोलंदाजीमधील त्याची कामगिरी ९ धावांमध्ये पाच बळी. पुश स्पोर्ट्सचा स्कोर ९ बाद १३२ इतका राहिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी