IND vs NZ: टीम इंडियामध्ये या धोकादायक गोलंदाजाची एंट्री, टी-२०मधून कट होऊ शकतो शमीचा पत्ता

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 15, 2021 | 18:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

india vs new zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये एका धोकादायक गोलंदाजाची एंट्री झाली आहे. हा वेगवान गोलंदाज इतका घातक आहे की यामुळे टी-२० मधून मोहम्मद शमीचा पत्ता कट होऊ शकतो. 

mohammad shami
IND vs NZ: टीम इंडियामध्ये या धोकादायक गोलंदाजाची एंट्री 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियामध्ये या धोकादायक गोलंदाजाची एंट्री
  • सर्वात चांगला गोलंदाज आहे
  • १७ नोव्हेंबरपासन टी-२० मालिकेला सुरूवात

मुंबई: भारताला(india) १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या(new zealand) आपल्याच घरच्या मैदानावर तीन सामन्यांची टी-२० मालिका(t-20 series) खेळायची आहे. टी-२० मालिका १७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. न्यूझीलंड तोच संघ आहे ज्याने भारताला टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये पाकिस्तानव्यतिरिक्त दुसरा सामना हरवत स्पर्धेतून बाहेर टाकण्यास मुख्य भूमिका साकारली होती. आता भारताकडे न्यूझीलंडकडून पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. टीम इंडिया नक्कीच प्रयत्न करेल की न्यूझीलंडला टी-२० मालिकेत ३-०ने हरवून टी-२० वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला घेतील. भारतासाठी टी-२० वर्ल्डकपचा प्रवास खूपच धक्कादायक होता. this dangerous bowler entry in team india

टीम इंडियामध्ये या धोकादायक गोलंदाजाची एंट्री

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये एका धोकादायक गोलंदाजाची एंट्री झाली आहे. हा वेगवान गोलंदाज इतका घातक आहे की लवकर भारतीय टी-२० संघातून मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजाचा पत्ता कट होऊ शकतो. हा वेगवान गोलंदाज आहे मोहम्मद सिराज. गेल्या काही काळापासून मोहम्मद सिराजची कामगिरी चांगली राहिली आहे. मोहम्मद सिराज कसोटी क्रिकेटमध्ये सलग कामगिरी करत आहे. याशिवाय सिलेक्टर्सनेही टी-२० फॉरमॅटमध्ये मोठे आणि शानदार पाऊल उचलले आहे. 

चांगला गोलंदाज आहे हा

मोहम्मद सिराज कसोटी क्रिकेटमधील एक महत्त्वाचा सदस्य बनला आहे. गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये सिराजने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल २०२१मध्येही मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली होती. सिराजने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५० सामने खेले. यात त्याने २८.४७च्या सरारीन ५० विकेट घेतल्या. 

भारत वि न्यूझीलंड संपूर्ण वेळापत्रक

तीन टी-२० सामन्यांची मालिका

पहिला सामना १७ नोव्हेंबबर २०२१- जयपूर संध्याकाळी सात वाजता
दुसरा सामना १९ नोव्हेंबर २०२१- रांची संध्याकाळी सात वाजता
तिसरा सामना २१ नोव्हेंबर २०२१ ० कोलकाता संध्याकाळी सात वाजता

२ सामन्यांची कसोटी मालिका

पहिला कसोटी सामना २५ ते २९ नोव्हेंबर - कानपूर- सकाळी साडे नऊ वाजता

दुसरा कसोटी सामना - ३ ते ७ डिसेंबर २०२१ - मुंबई - सकाळी साडेनऊ वाजता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी