या भारतीय खेळाडूने मुस्लिम मुलीशी केला होता विवाह, जगाची केली नाही पर्वा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 12, 2022 | 14:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिवम दुबेने आपली गर्लफ्रेंड अंजुम खानशी गेल्या वर्षी १६ जुलैला लग्न केले होते. दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. शिवमने आपल्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. 

shivam dubey
Cricketer: या भारतीय खेळाडूने मुस्लिम मुलीशी केला होता विवाह 
थोडं पण कामाचं
  • शिवम दुबे आणि अंजुम खानने हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने लग्न केले होते
  • शिवमने ट्विटरवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले होते.
  • त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते, आम्ही प्रेमाने प्रेम केले जे मोहोब्बतपेक्षा जास्त होते.

मुंबई: भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर शिवम दुबेने(team india all rounder cricketer shivam dubey) गेल्या वर्षी आपल्या गर्लफ्रेंडशी(girlfriend) लग्न केले होते. शिवम दुबेने ज्या मुस्लिम मुलीशी(muslim girl) लग्न केले होते तिचे नाव अंजुम खान आहे. हिंदू असतानाही शिवमने हिंदू-मुस्लिम धर्माची भिंत तोडत प्रेम केले आणि आपले नाते निभावले. दरम्यान, टीम इंडियामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी मुस्लिम मुलीशी लग्न केले आहे. This Indian cricketer marries with Muslim girl

अधिक वाचा - बैलाला डबलसीट घेऊन प्रवास करणाऱ्या बाइकस्वाराचा Video

शिवम दुबेने आपली गर्लफ्रेंड अंजुम खानशी गेल्या वर्षी १६ जुलैला लग्न केले होते. दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. शिवमने आपल्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by shivam dube (@dubeshivam)

शिवम दुबे आणि अंजुम खानने हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने लग्न केले होते. शिवमने ट्विटरवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते, आम्ही प्रेमाने प्रेम केले जे मोहोब्बतपेक्षा जास्त होते. आता आमचे नव्याने जीवन सुरू होत आहे जस्ट मॅरिड १६-०७-२०२१. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by shivam dube (@dubeshivam)

शिवम दुबेची पत्नी अंजुम खान उत्तर प्रदेशची आहे. अंजुम खानला मॉडेलिंगची आवड आहे. तिने अलिगढ मुस्लिम युनिर्व्हसिटीमधून शिक्षण घेतले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by shivam dube (@dubeshivam)

ऑलराऊंडर शिवम दुबे आयपीएल २०२२मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. हंगामाची सुरूवात करण्याआधीच फेब्रुवारीमध्ये शिवम दुबे बाबा बनला होता. शिवम दुबे आणि अंजुम खान यांनी अनेक वर्षे एकमेकांना सिक्रेट डेट केले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by shivam dube (@dubeshivam)

अधिक वाचा - अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मराठीतून द्या शुभेच्छापत्र

२८ वर्षीय शिवम दुबेने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. शिवमने भारतासाठी एक वनडे आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने ३५ आयपीएल सामनेही खेळले आहेत. या हंगामात त्याच्या बॅटमधून अनेक खेळी पाहायला मिळाल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी