Indian cricketer: संपूर्ण करिअरमध्ये कधीच RunOut नाही झाला हा क्रिकेटर, भारताला जिंकून दिला होता वर्ल्डकप

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 08, 2022 | 11:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Player: तुम्हाला माहीत आहे की टीम इंडियाचा असाही एक खेळाडू आहे जो आपल्या करिअरमध्ये कधी रनआऊट झाला नाही. या खेळाडूने भारताला वर्ल्डकप जिंकून दिला होता. 

run out
पूर्ण करिअरमध्ये कधीच RunOut नाही झाला हा भारताचा क्रिकेटर 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाला १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव आपल्या करिअरमध्ये कधीच रनआऊट झाले नाही.
  • वर्ल्डकपमध्ये १७५ धावांची खेळी करणारा कपिल भारताच्या सर्वोत्तम ऑलराऊंडरपैकी एक होते.
  • कपिल देव नेहमी आपली धाकड फलंदाजी आणि जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जात

मुंबई: क्रिकेट(cricket) खेळात दररोज काही नाही रेकॉर्ड बनत असतात तसेच तुटत असतात. खासकरून फलंदाज तर मैदानावर धमाल करत असतात. चौकार-षटकारांशिवाय हे फलंदाज वेगाने धावा करण्यातही माहीर असतात. मात्र या प्रयत्नात अनेकदा ते रनआऊट(runout) होतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की टीम इंडियाचा एक खेळाडू असाही आहे जो आपल्या करिअरमध्ये(career) कधी रनआऊट झाला नाही. This indian cricketer never runout in his whole career

अधिक वाचा - मालेगावहून मुंबईत आले 3 ट्रक,पोलिसांकडून मोठा प्लान उद्धवस्त

हा खेळाडू आतापर्यंत झाला नाही रनआऊट

टीम इंडियाला १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव आपल्या करिअरमध्ये कधीच रनआऊट झाले नाही. वर्ल्डकपमध्ये १७५ धावांची खेळी करणारा कपिल भारताच्या सर्वोत्तम ऑलराऊंडरपैकी एक होते. कपिल देव नेहमी आपली धाकड फलंदाजी आणि जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जात. कपिलने भारतासाठी १३१ कसोटी सामन्यांत ५२४८ धावा आणि ४३४ विकेट घेतल्या. तर वनडे क्रिकेटमध्ये ३हजारापेक्षा जास्त धावा आणि २५३ विकेट घेतल्या. कपिल देव आपल्या कसोटी करिअरमध्ये कधीही रनआऊट झाला नाही. हा त्याचा मोठा रेकॉर्ड आहे. 

या खेळाडूंच्या नावावरही आहे रेकॉर्ड

पीटर मे

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि फलंदाज पीटर मे आपल्या करिअरमध्ये कधीच रनआऊट झाला नाही. तो क्लासिक फलंदाज आणि शानदार कर्णधार होता. पीटर मेने इंग्लंडसाठी १९५१मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. पीटर मेने इंग्लंडसाठी ६६ कसोटी सामन्यांत ४५३७ धावा केल्या यात १३ शतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २३५ होती. 

अधिक वाचा - जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार

पॉल कॉलिंगवूड

इंग्लंडकडून तीनही फॉरमॅट खेळणारा पॉल कॉलिंगवूड खूपच शानदार फलंदाज होता. त्याने इंग्ंलंड संघाचे ६८ सामन्यांत प्रतिनिधित्व केले. यात त्याने चार हजारापेक्षा जास्त धावा केल्या. तो आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. पॉल कॉलिंगवूडनेही इंग्लंडच्या संघाला २०१०मद्ये आयसीसीची टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी जिंकून दिली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी