India vs Pakistan: भारतीय खेळाडूंचा हाच गुण आहे भारी, धोनीनं पाक खेळाडूंना केलं मार्गदर्शन तर कोहलीनं रिझवानला मारली मिठी

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानने (India vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला. भारताने दिलेलं 152 धावाचे आव्हान पाकिस्तानने (Pakistan) एकही विकेट न गमावता पार केले.

Dhoni guides Pakistani players, Kohli hugs Rizwan
धोनीनं पाक खेळाडूंना केलं मार्गदर्शन तर कोहलीनं रिझवानला मारली मिठी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानविरुद्धचा सामना झाल्यानंतर विराट कोहली आणि एमएस धोनीने परत एकदा चाहत्यांची मने जिंकली.
  • पाकिस्तानकडून बाबर आझमने (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 धावा केल्या.

दुबई : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानने (India vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला. भारताने दिलेलं 152 धावाचे आव्हान पाकिस्तानने (Pakistan) एकही विकेट न गमावता पार केले. पराभव झाल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी चाहत्यांच्या मनात आपला ठसा उमटवत असतात. पाकिस्तानविरुद्धचा सामना झाल्यानंतर विराट कोहली आणि एमएस धोनीने परत एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.  दरम्यान भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून बाबर आझमने (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 धावा केल्या आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 धावा केल्या. टीम इंडियाचा टी-20 मधला 10 विकेटने झालेला हा पहिलाच पराभव आहे, तर पाकिस्तानने पहिल्यांदाच टी-20 सामना 10 गडी राखून जिंकला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला टी-20 सामना संपल्यानंतर मात्र मैदानात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. टीम इंडियाचा मेंटर एमएस धोनी, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इमाद वसीम आणि इतर खेळाडू मैदानात गप्पा मारताना दिसले. धोनीनेही दिलखुलासपणे पाक खेळाडूंशी गप्पा केल्या. गप्पा करत असल्याचा व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची ही खरी स्टोरी आहे, असं कॅप्शन आयसीसीने या व्हिडिओला दिले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही मोठं मन दाखवले. सामना संपल्यानंतर विराटने पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवानला मिठी मारली. विराट सामना संपल्यानंतर बाबर आझमसोबत बोलतानाही दिसला. विराट आणि धोनीच्या कृत्यामुळे चाहते त्यांच्यावर फिदा झाली आहेत.
टी-20 वर्ल्ड कपमधला भारताचा पुढचा सामना रविवारी न्यूझीलंडविरुद्ध आहे. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाच्या टीम आहेत. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलसाठी क्वालिफाय होणार आहेत.

वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. याआधी 5 टी-20 आणि 7 वनडे वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीममधले सामने कायमच तणावपूर्ण असतात. दोन्ही देशांमध्ये असलेल्या संबंधांमुळे या सामन्यांना कायमच वेगळे रूप दिले जाते. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी