Indian Team: टीम इंडियाला ही चूक नेहमीच पडते भारी, यावर नाही मिळत आहे उपाय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 06, 2022 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs England:इंग्लंडविरुद्धच्ा कसोटी सामन्यात मिळालेल्या पराभवाचे मोठे कारण समोर आले आहे. टीमची एक कमकुवत बाजू गेल्या काही काळापासून सुधरतच नाहीये ज्यामुळे पराभवाचे तोंड पहावे लागते. 

team india
Indian Team: टीम इंडियाला ही चूक नेहमीच पडते भारी 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडने भारताला एजबेस्टन कसोटीत सात विकेटनी हरवले.
  • टीम इंडियाने पहिल्या डावात जबरदस्त फलंदाजी केली होती
  • मात्र सामन्याच्या तिसऱ्या डावात टीम इंडियाचे फंदाज फेल ठरले.

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळावर सवाल उपस्थित केले जात आहेत. टीम इंडियाकडे इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची चांगली संधी होती. मात्र एका दिवसाच्या खेळाने सामन्याचे संपूर्ण चित्रच बदलले. सामन्याच्या सुरूवातीे तीन दिवस टीम इंडिया विजयाच्या दिशेने होती. यानंतर टीम इंडियाचे तेच जुने दुखणे समोर आले ज्या कारणामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. This mistake heavy on team india

अधिक वाचा - महिलेच्या Delivery नंतर नवजात बाळाला पाहून डॉक्टरही थक्क!

ही चूक टीम इंडियाला पडली भारी

इंग्लंडने भारताला एजबेस्टन कसोटीत सात विकेटनी हरवले. टीम इंडियाने पहिल्या डावात जबरदस्त फलंदाजी केली होती आणि ४१६ धावांचा स्कोर उभा केला होता.ा संघाला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी मिळाली होती. मात्र सामन्याच्या तिसऱ्या डावात टीम इंडियाचे फंदाज फेल ठरले. असे काही पहिले घडले नाही. टीम इंडिया गेल्या काही काळापासून तिसऱ्या डावात खराब कामगिरी करत आहे. या कारणामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागत आहे. 

तिसऱ्या डावात वारंवार होतेय ही चूक

टीम इंडिया या सामन्याच्या तिसऱ्या डावात केवळ २४५ धावांवर आटोपला. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडचेही हेच म्हणणे आहे की टीमे फलंदाज तिसऱ्या डावात कमकुवत दिसतात. हाच कमकुवतपणा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही टीम इंडियाची हीच हालत झाली होती. 

अधिक वाचा - CM शिंदेंच्या स्वागतासाठी पत्नीने स्वत: वाजवला बँड!

टार्गेट वाचवण्यात अयशस्वी

टीम इंडियाचे आफ्रिकेतही असेच हाल झाले. या वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडियाने जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या डावात २६६ धावा केल्या होत्या आणि संघाला या सामन्यात ७ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. या मालिकेतील पुढच्याच सामन्यात केपटाऊनमध्ये टीम इंडियाने तिसऱ्या डावात १९८ धावा केल्या होत्या आणि ७ विकेटनी सामना गमवावा लागला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी