मुंबई: न्यूझीलंडच्या(new zealand) एका दिग्गज क्रिकेटरने नुकताच आपल्या आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. या खेळाडूने न्यूझीलंड संघासाठी १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २० वर्षांनी निवृ्त्ती(retirement) घेतल्यानंतर या खेळाडूने खुलासा केला आहे की तो गे(gay) आहे. या खुलाश्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये(international cricket) तो दुसरा समलैंगिक पुरुष क्रिकेटर बनला आहे. This new zeland cricketer reveals that he is gay
अधिक वाचा - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंगाज हीथ डेविस एक समलैंगिक म्हणून सगळ्यांच्या समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आणि फर्स्ट क्लास क्रिकेट सोडल्याच्या १८ वर्षांनी त्याने हा खुलासा केला आहे. महिला क्रिकेट जगतात अनेक समलैंगिक खेळाडू आधीच समोर आलेत मात्र पुरुष क्रिकेटमध्ये हे दुसरे प्रकरण समोर आले आहे.
५० वर्षीय हीथ डेविस सध्या ऑस्ट्रेलियात राहत आहे. हीथ डेविसने २ ऑगस्ट २०२२ला ऑनलाईन पत्रिका द स्पिनऑफसोबतच्या एका मुलाखतीत म्हटले की, मला वाटले की माझ्या जीवनाचा हा भाग होता जो मी लपवत होतो. मी वेलिंग्टनमध्ये बाहेर होण्यापासून थोडा घाबरत होतो. ऑकलंड संघामध्ये प्रत्येकाला माहीत होते की मी गे आहे मात्र हा इतका मोठा मुद्दा वाटत नव्हता. मला फक्त स्वातंत्र्याची जाणीव झाली.
अधिक वाचा - एकनाथ शिंदे अडचणीत; औरंगाबादमध्ये तक्रार दाखल
डेविसने १९९४ ते १९९७ या दरम्यान पाच कसोटी आणि ११ वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. हीथ डेविसच्या आधी इंग्लंडचा माजी विकेटकीपर स्टीव्हन डेविसनेही २०११ या वर्षात स्वत: समलैंगिक असल्याचा खुलासा केला होता.