T-20WC: लोकेश राहुल-रोहित शर्माची जोडी न्यूझीलंडविरुद्ध आहे हिट, पाहा कशी ते

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 28, 2021 | 15:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

kl rahul-rohit sharma: संघाची नाव पलीकडे नेण्याची जबाबदारी लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे. राहुल आणि हिटमॅनचा रेकॉर्ड किवी संघाविरुद्ध कमालीचा राहिला आहे.

india vs new zealand
न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही जोडी आहे हिट... 
थोडं पण कामाचं
  • ३१ ऑक्टोबरला भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्धच्या मैदानात उतरणार आहे.
  • या सामन्यात भारताची स्थिती करो वा मरो अशी असणार आहे.
  • भारताला या सामन्यात काही करून विजय मिळवावाच लागेल.

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup 2021)मध्ये टीम इंडिया(team india) संकटात जाताना दिसत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या(pakistan) सामन्यात भारताला १० विकेटनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे कोहली टीमचा(kohli team) आत्मविश्वास थोडा डळमळीत झाला आहे. ३१ ऑक्टोबरला भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्धच्या(india vs new zealand) मैदानात उतरणार आणि या सामन्यात त्यांची स्थिती करो वा मरो अशी असणार आहे.This opener cricketers hit record against new zealand

भारताला या सामन्यात काही करून विजय मिळवावाच लागेल. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात जर भारताला विजय मिळवता आला नाही तर भारताच्या हातून वर्ल्डकप गेलाच असे समाजावे लागेल. 

संघाची नाव पलीकडे नेण्याची जबाबदारी लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे. राहुल आणि हिटमॅनचा रेकॉर्ड किवी संघाविरुद्ध कमालीचा राहिला आहे. आकड्यांनुसार या दोघांची बॅट न्यूझीलंडविरुद्ध चांगलीच चालली आहे. त्यांनी या सामन्यात कमाल केली तर समजा सेमीफायनलचे तिकीट पक्के समजावे. 

लोकेश राहुलने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळले आहेत आणि या दरम्यान त्याच्या बॅटमधून १४४.५१च्या स्ट्राईक रेटने २२४ धावा केल्यात. त्याची सरासरी ५६ इतकी आहे. या भारतीय सलामीवीराने दोन अर्धशतके ठोकली आहेत. रोहितचा रेकॉर्डही किवी टीमविरुद्ध चांगला राहिला आहे.

हिटमॅनने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये १३७.९५ च्या स्ट्राईक रेटने ३८८ धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी न्यूझीलंडच्या धरतीवर या दोन्ही फलंदाजांनी धमाल उडवून दिली होती. तसेच क्रिकेट मालिकेत टीम इंडियाला ५-० असा विजय मिळवून दिला होता. रोहितने ४ सामन्यांत १५०च्या स्ट्राईक रेटने १४० धावा कुटल्या होत्या. 

भारताचा पुढील सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आहे. त्यााधी हार्दिकच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३१ ऑक्टोबरच्या सामन्यासाठी उपलब्ध आहे मात्र तो प्लेईंग ११मध्ये निवडला जाणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी