या दोन क्रिकेटर भावांनी भारताला जिंकून दिलाय वर्ल्डकप, गरिबीतून आले वर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 18, 2022 | 15:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

युसुफ पठाणचा जन्म 17 नोव्हेंबर 1982ला गुजरातच्या वडोदरामध्ये गुजराती पठाण कुटुंबात झाला होता. त्याने 2001मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणे सुरू केले आणि सप्टेंबर 2007 मध्ये द. आफ्रिकेत आयोजित करण्ात आलेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. 

pathan brothers
या दोन क्रिकेटर भावांनी भारताला जिंकून दिलाय वर्ल्डकप 
थोडं पण कामाचं
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने युसूफ पठाणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
  • सोबतच त्याचा छोटा भाऊ आणि स्टार ऑलराऊंडर इऱफान पठाण यांचा दोघांचा एकत्र फोटो शेअर केला आहे.
  • यात दोघेही पठाण ब्रदर्स क्रिकेट जर्सीमध्ये मैदानावर हातात बॉल घेऊन आहेत.

मुंबई: भारताचा माजी ऑलराऊंडर युसुफ पठाण(indias former allrounder yusuf pathan) आज गुरूवारी 40 वर्षांचा झाला. हा खेळाडू डोमेस्टिक आणि आंतरराष्टीय क्रिकेट(international cricket) या दोन्हींमध्ये सगळ्यात धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. आपल्या खेळत असलेल्या दिवसांमध्ये युसुफ काही प्रमुख गोलंदाजांसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होता. त्याने आपल्या बॅटमधून उत्तमोत्तम खेळी साकारताना अनेक मोठे रेकॉर्ड(record) केले. त्याने आपल्या गोलंदाजीने अनेक प्रमुख गोलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढत आपल्या संघासाठी महत्त्वाच्या विकेटही(wickets) घेतल्या. This pathan brothers make india win worldcup

अधिक वाचा - आपलं काय चुकतयं, हे कळायलं लागलयं : बाळासाहेब थोरात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने युसूफ पठाणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्याचा छोटा भाऊ आणि स्टार ऑलराऊंडर इऱफान पठाण यांचा दोघांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. यात दोघेही पठाण ब्रदर्स क्रिकेट जर्सीमध्ये मैदानावर हातात बॉल घेऊन आहेत. त्यांचा हा फोटो क्रिकेट चाहत्यांसाठी एक प्रेरणा देण्याचे काम करेल. 

युसुफ पठाणचा जन्म  17 नोव्हेंबर 1982ला गुजरातच्या वडोदरामध्ये गुजराती पठाण कुटुंबात झाला.  2007 मध्ये द. आफ्रिकेत पहिल्यांदा   टी20 वर्ल्डकप झाला होता. यात त्याने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने फायनल सामन्यात भारतासाठी डावाची सुरूवात केली आणि 15 धावा केल्या होत्या. युसुफ पठाणने फेब्रुवारी 2021मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. 

युसुफ पठाणने भारतासाठी आपला पहिला वनडे सामना 10 जून, 2008 मध्ये ढाकामध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. तर त्याने आपला शेवटचा सामना 18 मार्च 2012 मध्ये ढाकामध्ये पाकिस्तानविरुद्धच खेळला होता. पठाणने भारतासाठी केवळ एकच कसोटी सामना खेळला आहे. मात्र त्याने टी20 क्रिकेटमध्ये एक प्रमुख म्हणून आपले स्थान मिळवले. 

अधिक वाचा - शिवसेना परत भाजपकडे मैत्रीची साद घालणार का?

लहान भाऊ इरफान पठाण यांचेही करिअ शानदार राहिले. इरफानने 29 टेस्ट, 120 वनडे आणि 24 टी20 क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यात कसोटीत त्याने 100, वनडेमध्ये 173 आणि टी20मध्ये 23 विकेट मिळवल्या. स्टार ऑलराऊंडनरे अनुक्रमे 1105, 1544 आणि 172 धावाही केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी