मुंबई: बर्मिंगहम कसोटीत(bermingham test) इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला ७ विकेटनी(india vs england) मात दिली. यासोबतच भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका(test series) २-२ अशी बरोबरीत सुटली. टीम इंडिया(team india) १५ वर्षानंतर इंग्लंडच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकण्यापासून वंचित राहिली. भारताने जर ही कसोटी जिंकली असती अथवा अनिर्णीत राखली असती तर ही कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला गेला असता.This player became villain in india vs england test match
अधिक वाचा - गणेशोत्सवासंदर्भात मुंबई महापालिकेचा सर्वात मोठा निर्णय
२००७मध्ये टीम इंडियाने शेवटची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये १-०अशी जिंकली होती. बर्मिंगहममध्ये खेळवण्यात आलेल्या निर्णायक कसोटीत इंग्लंडचा संघ अचानक टीम इंडियावर भारी पडला. या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने केवळ ३ धावा करत हे आव्हान परतून लावले. सोबतच भारताचे मालिका विजयाचे स्वप्न संपुष्टात आले. या सामन्यात एक वेळ अशी आली की एक खेळाडू व्हिलन बनला. त्याच्या एका चुकीने भारत हा सामना हरला.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ३८व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला. मोहम्मद सिराजच्या या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर हनुमा विहारीने स्लिपमध्ये इंग्लंडचा धोकादायक फलंदाज जॉनी बेअरस्ट्रॉचा कॅच सोडला. जॉनी बेअरस्ट्रॉ त्यावेळेस १४ धावांवर खेळत होता. विहारीने जर हा कॅच सोडला नसता तर जॉनीने नाबाद ११४ धावांची खेळी केली नसती.
अधिक वाचा - "फडणवीसांनी काल शिंदेंकडून माईक हिसकावला, उद्या आणखी काय..."
जॉनी बेअरस्ट्रॉने केवळ नाबाद ११४ धावाच केल्या नाहीतर जर जो रूटसोबत मिळबून २६९ धावांची भागीदारी केली. जॉनी बेअरस्ट्रॉ आणि जो रूटने मिळून टीम इंडियाला या सामन्यातून बाहेर ढकलले. टीम इंडियाच्या या परिस्थितीला हनुमा विहारीला जबाबदार ठरवले जात आहे.