मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका ९ जून ते १९ जूनपर्यंत भारतात खेळवली जाणार आहे. या टी-२० मालिकेत(t-20 series) एक खेळाडू असा आहे जो एकट्याच्या जीवावर भारताला विजय मिळवून देऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या टी-२० मालिकेसाठी लोकेश राहुलला(lokesh rahul) नेतृत्व देण्यात आले आहे. तर श्रेयस अय़्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंना मिडल ऑर्डरमध्ये संधी दिली गेली आहे.This player can win series against south africa on one man army
अधिक वाचा - पती - सासरच्यांना खुश ठेवणे या राशीच्या मुलींसाठी नाही सोपे
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या टी-२० मालिकेत तिसऱ्या स्थानावर गोलंाजीसाठी उतरणार ही पूर्ण शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकाविरुद्ध टी-२० मालिकेतही श्रेयस अय्र तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्यास उतरला होता. योगायोग म्हणजे श्रीलंकेविरुद्ध या टी-२० मालिकेतही विराट कोहलीला आराम दिला होता. श्रेयस अय्यरने त्या टी-२० मालिकेत मिळालेल्या संधीचा फायदा उचलत एकूण २०४ धावा ठोकल्या. श्रेयस अय्यरला त्या टी-२- मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजचा अवॉर्ड मिळाला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत जर तिसऱ्या नंबरवर श्रेयस अय्यर हिट राहिला तर विराट कोहलीच्या टी-२०मधील जागेला धोका निर्माण होऊ शकतो. श्रेयस अय्यरही टी-२०मध्ये तिसऱ्या नंबरवर फलंदाजीची इच्छा व्यक्त केली आहे ज्या स्थानावर अनेक वर्षांपासून दिग्गज फलंदाज विराट कोहली बॅटिंग करतात. श्रेयस अय्यरने ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ८०९ धावा केल्या आहेत.
अधिक वाचा - एलआयसीने जाहीर केला लाभांश, गुंतवणुकदारांची कमाई
लोकेश राहुल (कर्णधार), रूतुराज गायकवाड़, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उप कप्तान, विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह और उमरान मलिक.