मुंबई: भारताला स्वातंत्र्य(Independance day) मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाला १९४७ रोजी इंग्रंजांच्या हुकूमशाहीतून स्वातंत्र्य मिळाले होते. सर्व भारतीय आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. यात भारतीय क्रिकेटर्सनीही झेंडा फडकवत साऱ्यांची मने जिंकली. अनेक खेळाडूंनी आपल्या घरी तिरंगा फडकवला. तर काही स्टार खेळाडूंनी व्हिडिओ बनवत खास मेसेज शेअर केला.
अधिक वाचा - जमिनीच्या वादातून छोट्या भावानं संपवलं थोरल्या भावाला
भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने झेंडा फडकवत साऱ्यांची मने जिंकली. सचिनच्या विस्फोटक फलंदाजीचे असंख्य चाहते आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकली आहेत. सचिन तेंडुलकरने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले की, हमेशा रहा है मेरे दिल में तिरंगा, आज लहराएगा मेरे घर पर भी तिरंगा. दिल में भी तिरंगा, घर पर भी तिरंगा. जय हिंद'
𝐃𝐢𝐥 𝐌𝐞𝐢𝐧 𝐁𝐡𝐢 𝐓𝐢𝐫𝐚𝐧𝐠𝐚 𝐆𝐡𝐚𝐫 𝐏𝐚𝐫 𝐁𝐡𝐢 𝐓𝐢𝐫𝐚𝐧𝐠𝐚! 🇮🇳#AzadiKaAmritMahotsav #HarGharTiranga pic.twitter.com/SayDOYri1j — Sachin Tendulkar (@sachin_rt) August 13, 2022
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हातात तिरंगा पकडलेला फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्याने लिहिले की, माझ्या सर्व भारतीय बंधुंना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये कमालीचा खेळ करत टीम इंडियात पुनरागमन केले.
शिखर धवन- व्ही व्ही एस लक्ष्मणने दिल्या शुभेच्छा
भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवनने व्हिडिओ बनवत भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हीव्ही एस लक्ष्मणने इन्स्टाग्रामवर लिहिले, आपल्या देशाचा महिमा सदा अमर राहो. स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना प्रेम, शांती आणि समृद्धीच्या शुभेच्छा. भारतीय असण्याचा गर्व आहे. जय हिंद.
आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जय हिंद 🇮🇳 #IndiaAt75 #IndependenceDay2022 pic.twitter.com/T8QDvihXr4 — Shikhar Dhawan (@SDhawan25) August 15, 2022
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरने भारतीय सिनेमांची गाणी बनवत इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्याने स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने भारतातील सर्व कुटुंबे आणि मित्रपरिवाराला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मिताली राजनेही आपल्या घरी तिरंगा फडकावला. तिने लिहिले, आपला तिरंगा आपला गौरव आहे. उंच उडत असलेला तिरंगा एक असे दृश्य आहे जे प्रत्येक भारतीयाच्या मनाला सुख देता. माझ्या घरी तिरंगा फडकला.
Our flag is our pride! The tricolour flying high is a sight that fills the heart of every Indian with joy. Hoisted the Tiranga at my residence today. #HarGharTiranga #AmritMahotsav pic.twitter.com/eaFohBmiJd — Mithali Raj (@M_Raj03) August 14, 2022